Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • रुपाली चाकणकर फरार? महिला नेत्यांचा संशय खरा! १५ दिवसांपासून आयोगाच्या कार्यालयात गैरहजर
Top News

रुपाली चाकणकर फरार? महिला नेत्यांचा संशय खरा! १५ दिवसांपासून आयोगाच्या कार्यालयात गैरहजर

Rupali Chakankar Absconding

Rupali Chakankar Missing : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) गेल्या १५ दिवसांपासून पुण्यातील त्यांच्या कार्यालयात अनुपस्थित असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा खुलासा स्वतः महिला आयोगाच्या कार्यालयात (Office of Commission for Women) कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनीच केला आहे. त्यामुळे महिला तक्रार निवारण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर महिला नेत्या रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी यापूर्वी चाकणकरांना त्या फरार होण्यापूर्वी अटक करा असं म्हटलंय. त्यामुळे आता चाकणकर खरचं फरार (Rupali Chakankar Absconding) तर झाल्या नाहीत ना? या शंकांना बळ मिळालंय.

हेही वाचा – रुपाली चाकणकर फरार? रुपाली पाटील ठोंबरे यांची खळबळजनक पोस्ट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आयोगाच्या कार्यालयात समुपदेशनासाठी कोण आहे?

कार्यालयात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आयोगाचे कामकाज व्यवस्थित माहिती नसल्याचेही समोर आले आहे. तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांना नेमके कुठे मार्गदर्शन करायचे, कोणत्या अधिकाऱ्याकडे पाठवायचे, याबाबत स्पष्टता नसल्याचे चित्र आहे. विशेषतः येरवडा येथील समुपदेशन केंद्रात कोणते अधिकारी कार्यरत आहेत, याचीही माहिती कर्मचाऱ्यांना नसल्याचे उघड झाले आहे.

या सर्व प्रकारामुळे महिला आयोगाचे प्रत्यक्ष कामकाज कसे सुरू आहे? महिलांच्या तक्रारींचे निवारण नेमके कोण आणि कसे करत आहे? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

चाकणकर फरार रुपाली ठोंबरे यांचा आरोप

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी केलेला आरोपही चर्चेत आला आहे. त्यांनी चाकणकर या फरार असल्याचा गंभीर आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर, रूपाली चाकणकर यांनी समोर येऊन स्पष्टीकरण का दिले नाही? त्या आरोपांना उत्तर देण्याचे टाळत आहेत का? अशा प्रश्नांची चर्चा आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सुरू झाली आहे.

सध्या या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत भूमिका समोर आलेली नसून, अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. त्यामुळे महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts