Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • 29 कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ! डोंबिवलीतील 35 वर्ष जुनी इमारत अवैध घोषित; KDMCची पाडकाम नोटीस
Mumbai

29 कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ! डोंबिवलीतील 35 वर्ष जुनी इमारत अवैध घोषित; KDMCची पाडकाम नोटीस

KDMC Demolition Notice: डोंबिवलीत Kalyan Dombivli Municipal Corporation (KDMC) ने मोठी कारवाई करत ३५ वर्षांपूर्वी बांधलेली एक इमारत बेकायदेशीर ठरवली असून ती तातडीने रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे तब्बल २९ कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे.

डोंबिवली पूर्वेतील श्यामा प्रसाद मुखर्जी रोडजवळील ‘भावना इमारत’ ही बेकायदेशीर बांधकाम असल्याचा दावा करत महापालिकेने ती पडण्याची नोटीस बजावली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे रहिवाशांमध्ये मोठा संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: हा फक्त मार्केटिंग स्टंट…’ प्रसिद्ध डेव्हलपरचा दावा; Anthropic च्या ‘Mythos’ मुळे मोठा बदल होणार नाही

२००२ पासून सुरू आहे वाद

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या इमारतीबाबत २००२ मध्येही पाडकामाची नोटीस देण्यात आली होती. त्यावेळी रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर कारवाईला स्थगिती मिळाली होती.

मात्र नंतर काही कायदेशीर प्रक्रिया बदलल्यानंतर ही स्थगिती रद्द झाल्याचे मानले गेले आणि आता पुन्हा एकदा KDMC ने कारवाई सुरू केली आहे.

“आम्ही कुठे जायचं?” रहिवाशांचा प्रश्न

29 कुटुंबांना अचानक घर खाली करण्याची नोटीस मिळाल्याने रहिवाशांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. काही कुटुंबांमध्ये वृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिला असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर घर सोडावे लागणार असल्याने रहिवाशांनी प्रशासनाकडे पर्यायी व्यवस्था देण्याची मागणी केली आहे.

KDMCचा गंभीर दावा

महापालिकेच्या मते, इमारत बांधकाम नियमांचे पालन न करता उभारण्यात आली असून सध्याच्या घडीला कोणतीही न्यायालयीन स्थगिती लागू नाही.

त्यामुळे रहिवाशांना 15 दिवसांत इमारत रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वीज-पाणी तोडण्याचा इशारा

नोटिशीनुसार, दिलेल्या मुदतीत इमारत रिकामी न केल्यास वीज आणि पाणी पुरवठा खंडित केला जाईल. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात पाडकाम करण्यात येणार आहे.

तसेच पाडकामाचा खर्चही रहिवाशांकडून वसूल केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रहिवाशांसमोर मोठे संकट

35 वर्षांपासून राहात असलेल्या घरांवर कारवाई होणार असल्याने भावना इमारतीतील कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अचानक आलेल्या या निर्णयामुळे त्यांच्यासमोर निवाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts