• Home
  • ताज्या बातम्या
  • महागाईचा तडाखा! अमूलकडून दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ; उद्यापासून नवे दर लागू
Top News

महागाईचा तडाखा! अमूलकडून दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ; उद्यापासून नवे दर लागू

amul milk

Amul Milk Price Hike: देशात आधीच महागाईचा ताण वाढत असताना आता अमूलकडून दुधाच्या दरात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून अमूल दूध २ रुपयांनी महाग होणार असून या निर्णयामुळे सर्वसामान्याच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

अमूलने दिलेल्या माहितीनुसार, पशुखाद्य, चारा, पॅकेजिंग आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादन खर्च वाढल्याने ही दरवाढ अपरिहार्य ठरली आहे. कंपनीने स्पष्ट केले की ही दरवाढ सरासरी २ रुपयांपर्यंत असून ती साधारण २.५ ते ३.५ टक्क्यांच्या दरम्यान आहे.

हेही वाचा: 29 कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ! डोंबिवलीतील 35 वर्ष जुनी इमारत अवैध घोषित; KDMCची पाडकाम नोटीस

१४ मे पासून लागू होणार नवे दर

नवीन दर १४ मे पासून देशभरात लागू होतील. ही वाढ मुळच्या अमूलच्या सर्व ताज्या दूध पॅकेट्सवर लागू असेल.

कंपनीने सांगितले की या दरवाढीचा काही भाग थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ग्राहकांवर थेट परिणाम

दूध हा दैनंदिन गरजेचं घटक असल्याने या दरवाढीचा थेट परिणाम सामान्य कुटुंबच्या मानसिक बजेटवर होणार आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांसाठी हा आणखी एक झटका मानला जात आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव?

जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार आणि इतर आर्थिक घडामोडींमुळे महागाई वाढत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

सोने-चांदीच्या दरातही वाढ

दरम्यान, बाजारात सोने-चांदीच्या किमतींमध्येही मोठी वाढ दिसून येत आहे. वाढत्या गुंतवणूक मागणीमुळे सोन्याचा दर विक्रमी पातळीवर पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

पुढील काळात काय होणार?

पेट्रोल-डिझेल आणि इतर इंधन दरांबाबतही दरवाढीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी दिवसांत महागाईचा दबाव आणखी वाढू शकतो, अशी चर्चा आर्थिक वर्तुळात सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts