Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • कानात झुमका, नाकात नथनी अन्पा यात पैंजण … धोती स्कर्टमध्ये आलिया भट्टचा मॉडर्न ‘बहू’ लूक; कान्समध्ये ठरली सेंटर ऑफ अट्रॅक्शन
मनोरंजन

कानात झुमका, नाकात नथनी अन्पा यात पैंजण … धोती स्कर्टमध्ये आलिया भट्टचा मॉडर्न ‘बहू’ लूक; कान्समध्ये ठरली सेंटर ऑफ अट्रॅक्शन

Alia Bhatt Cannes Look: आलिया भट हिने कॅन्स फिल्म फेस्टिवल मधील आपल्या नव्या लूकने पुन्हा एकदा चाहत्यांची मन जिंकली आहेत. यावेळी आलियाने पारंपरिक साडीला मॉडर्न ट्विस्ट देत धोती- स्टाईल स्कर्ट आणि कॉर्सेट परिधान केले होते.

आलिया भट (Alia Bhatt) कॅन्स फिल्म फेस्टिवल (Cannes Film Festival) मध्ये पुन्हा एकदा आपल्या स्टायलिश लूकने चाहत्यांचे वेधून घेतले आहे. यावेळी आलियाने पारंपरिक भारतीय फॅशनला आधुनिक टच देत खास धोती-स्टाइल आउटफिटमध्ये एंट्री केली. तिच्या या लूकमध्ये इंडियन एलिगन्स आणि मॉडर्न फॅशनचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

हेही वाचा: शुक्र आणि बुध करणार राशी परिवर्तन! १४ मेपासून ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार सकारात्मक बदल; वाचा तुमचे राशीभविष्य

आयव्हरी आऊटफिटमध्ये खुलला रॉयल लूक

कान्सच्या विशेष कार्यक्रमासाठी आलियाने आयव्हरी रंगातील आकर्षक आउटफिटची निवड केली होती. पारंपरिक साडीच्या ड्रेपिंग स्टाइलला आधुनिक डिझाइनसोबत फ्युजन करत हा लूक तयार करण्यात आला होता.

धोती-स्टाइल स्कर्ट, लांब ट्रेल आणि कॉर्सेट डिझाइनमुळे तिचा संपूर्ण लूक अत्यंत क्लासी आणि रॉयल दिसत होता.

पारंपरिक दागिन्यांनी वाढवली शोभा

या लूकमध्ये आलियाने पायात पैंजण, हातात हाथफूल, नथ आणि मोत्यांची बिंदी घालत भारतीय संस्कृतीचा सुंदर स्पर्श दिला.

साध्या पण एलिगंट ज्वेलरीमुळे तिच्या आउटफिटची सुंदरता आणखी खुलून दिसली. सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या या ‘मॉडर्न बहू’ लूकचे कौतुक केले.

कॉर्सेट आणि ड्रेपिंगमुळे मिळाला मॉडर्न टच

आलियाच्या आउटफिटमधील कॉर्सेट हा संपूर्ण लूकचा मुख्य आकर्षण ठरला. फिटेड डिझाइन, सूक्ष्म एम्ब्रॉयडरी आणि स्टायलिश ड्रेपिंगमुळे पारंपरिक साडीला वेगळाच ग्लॅमरस अंदाज मिळाला.

धोती स्कर्टवरील प्लीट्स आणि फ्लोई ट्रेलमुळे आउटफिट अधिक ग्रेसफुल दिसत होते.

चंदेरी फॅब्रिकची खासियत

या लूकमध्ये वापरण्यात आलेले चंदेरी फॅब्रिक हे भारतीय हँडलूम परंपरेतील प्रसिद्ध कापड मानले जाते. हलके टेक्स्चर, सौम्य चमक आणि नाजूक विणकाम यासाठी चंदेरी विशेष ओळखले जाते.

फॅशन जगतात हे फॅब्रिक रॉयल आणि एलिगंट लूकसाठी लोकप्रिय मानले जाते.

साधा मेकअप, पण जबरदस्त स्टाइल

आलियाने या लूकसोबत हलका आणि नॅचरल मेकअप निवडला होता. सॉफ्ट पिंक टोन, हलका आय मेकअप आणि वेव्ही ओपन हेअरस्टाइलमुळे तिचा लूक अधिक आकर्षक दिसत होता.

पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइलचा सुंदर मेळ साधणाऱ्या या लूकने कान्समध्ये पुन्हा एकदा आलियाची फॅशन सेन्स चर्चेत आणली आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts