Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • विद्यार्थिनीची आत्महत्या: ‘मिस यू डॅडी, मम्मी’ असे शेवटचे शब्द चिठ्ठीत
ताज्या बातम्या

विद्यार्थिनीची आत्महत्या: ‘मिस यू डॅडी, मम्मी’ असे शेवटचे शब्द चिठ्ठीत

suicide

कोल्हापूर: निरंजन कामत

suicide: शिवाजी विद्यापीठातील (shivaji vidyapeeth) मुलींच्या वसतिगृहात एका २३ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. मृत विद्यार्थिनीचे नाव इशिता मधुसुदन सावंत (२३, रा. रामभुवन वाडा, रायबंदर, गोवा) (Ishita Madhusudan Sawant) असे आहे. ही घटना विद्यापीठ परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे. या घटनेमुळे शिवाजी विद्यापीठ आणि वसतिगृह परिसरात शोकाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी राजारामपुरी पोलीस (rajaram police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा: भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची पदाधिकारीच १ कोटींची खंडणी मागते तेव्हा…!

मानसशास्त्राच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी

शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. इशिता एम.ए. मानसशास्त्राच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. ती वसतिगृहातील खोली क्रमांक ३० मध्ये चार सहकारी मुलींसोबत राहत होती. गुढीपाडव्याच्या सुट्टीनिमित्त इतर तिघी मुली गावी गेल्याने इशिता खोलीत एकटीच होती. रात्री उशिरापर्यंत ती खोलीतून बाहेर न आल्याने शेजारील खोलीतील मुलींनी आत डोकावून पाहिले असता तिने गळफास घेतल्याचे दिसले.

उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात

वसतिगृहाच्या वॉर्डन शीला सोनवणे (shila sonvane)यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला सीपीआर देऊन रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. शेंडा पार्क येथे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती

मृत्यूपूर्वी इशिताने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यात “मिस यू डॅडी, मम्मी, मला माफ करा” असे शब्द लिहिले आहेत. तसेच तिने स्वतःची जन्मतारीखही नोंदवली होती. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस तपास करत असून, तिने आत्महत्येपूर्वी कोणाला फोन केला होता का, याचीही चौकशी सुरू आहे. तिच्या खोलीतून मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची तपासणी केली जात आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts