Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • “त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, तो माणूस…”, मोनालिसाने दिग्दर्शक सनोज मिश्रावर केले गंभीर आरोप
Top News

“त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, तो माणूस…”, मोनालिसाने दिग्दर्शक सनोज मिश्रावर केले गंभीर आरोप

Viral Girl Monalisa | महाकुंभ मेळाव्यातील (Mahakumbh Mela) व्हायरल गर्ल मोनालिसा (Viral Girl Monalisa) सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. मोनालिसाने तिचा प्रियकर फरमान खानसोबत लग्न केले आहे. त्यानंतर तिच्या लग्नावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. अनेकांनी हे लव्ह जिहाद असल्याचं म्हटलं आहे. तर मोनालिसाच्या घरच्यांचा देखील या लग्नाला विरोध होता. तसेच मोनालिसाला चित्रपटात काम देणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा (Sanoj Mishra) यांनी देखील हे लव्ह जिहाद असल्याचं म्हटलं होतं. अशातच आता मोनालिसाने सनोज मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा – अजित पवारांचे सर्व अधिकार अन् पक्षाचा ताबा प्रफुल्ल पटेलांकडे? रोहित पवारांचा गंभीर आरोप, म्हणाले, सुनेत्रा काकींना…

मोनालिसाने नेमके काय आरोप केले?

मोनालिसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात मोनालिसाने गंभीर आरोप केले आहेत. मोनालिसाने लग्नानंतर एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत मोनालिसाने तिचा चित्रपटाच्या सेटवर शारीरिक आणि मानसिक छळ झाला असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

मोनालिसाने म्हटलं आहे की, दिग्दर्शक सनोज मिश्रा हा चांगला माणूस नाही. त्याने मला फिल्मच्या सेटवर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आहे. मी याबाबत माझ्या कुटुंबाला सांगितलं होतं, पण सनोज मिश्राने माझ्या घरच्यांना पैशाचं आमिष दाखवत त्यांचं तोंड बंद केलं होतं.

सनोज मिश्राने अनेकदा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. फिल्मच्या सीनच्या संदर्भात चर्चा सुरू असताना सनोज मिश्राचा संयम सुटला होता. त्याने माझ्यावर फक्त आरडाओरडाच केला नाही तर रागाच्या भरात मला शारीरिक इजा देखील पोहोचवली आहे. त्याने अनेकदा मला पंच मारले आहेत, अत्यंत अपमानजनक अशी वागणूक दिली आहे, असे गंभीर आरोप मोनालिसाने केले आहेत.

मोनालिसाने केलेल्या या आरोपांनंतर दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मोनालिसा कायदेशी पावलं उचलणार आहे. तिनं सनोज मिश्रावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी तिने सिनेसृष्टीतील संघटनांकडे धाव घेतली आहे.

दरम्यान, दिग्दर्शक सनोज मिश्राने मोनालिसाला ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची ऑफर दिली होती. मोनालिसा ही कुंभमेळ्यात व्हायरल झाल्यानंतर सनोज मिश्रा तिच्या शोधात प्रयागराज महाकुंभ मेळाव्यात गेला होता. तिथे त्याने तिच्या कुटुंबाची भेट घेत तिला चित्रपटाची ऑफर दिली होती.

मोनालिसाने केरळमधील तिचा प्रियकर फरमान खानसोबत लग्नगाठ बांधली आहे. घरात कुणालाही कल्पना न देता मोनालिसाने प्रियकर फरमान खानसोबत पारंपारिक पद्धतीने मंदिरात जाऊन लग्न केले आहे. मोनालिसा आणि फरमानने तिरूवनंतपुरमधील नैनार मंदिरात जाऊन लग्न केले आहे. यावेळी त्यांचं लग्न पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

मोनालिसाच्या लग्नाबाबत दिग्दर्शक सनोज मिश्राने गंभीर आरोप केला आहे. हे लव जिहादचं प्रकरण असून मोनालिसाला फसवलं जात आहे, असा आरोप सनोज मिश्राने केला आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts