Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • टाटा मोटर्सवर मोठा सायबर हल्ला; उत्पादन विस्कळीत,संरक्षण विमा नसल्याने दुहेरी आव्हान
Top News

टाटा मोटर्सवर मोठा सायबर हल्ला; उत्पादन विस्कळीत,संरक्षण विमा नसल्याने दुहेरी आव्हान

सायबर हल्ला होण्याचं प्रमाण सध्या जोरदार वाढत चाललं आहे. आता टाटा मोटर्स याची शिकार बनलं असून टाटा मोर्टसवर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. यामुळे कंपनीला तब्बल 21 हजार कोटींचं नुकसान सहन करावं लाग असून कंपनीच्या सब्सिडियरी जॅग्युअर लँड रोव्हरवर सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. या सायबर हल्ल्यानंतर कंपनीला इंग्लंडलमधील जेएलआरच्या वेस्ट मिडलँड्स आणि मर्सिसाइड कारखान्यांमधील उत्पादन थांबवावं लागल्यामुळे कंपनीला £2 बिलियन म्हणजे तब्बल 21 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. या गोष्टीचा थेट परिणाम टाटा मोटर्सच्या शेअरवर होत असल्याने यामुळे गुंतवणुकदारांमधील चिंता वाढली आहे.

हल्ल्यामुळे उत्पादन विस्कळीत;सायबर विमा संरक्षण नाही; कंपनीला दुहेरी आव्हान

टाटा मोटर्सच्या जेएलआरच्या कम्प्युटर प्रणालीवर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सायबर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यादरम्यान, हॅकर्सनी सिस्टीममध्ये घुसखोरी केल्यामुळे कारखान्यातील काम मंदावलं. जेएलआरमध्ये दररोज सुमारे एक हजार वाहनांचं उत्पादन होत, मात्र या सायबर हल्ल्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून उत्पादन थांबवण्यात आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे कंपनीकडे सायबर विमा संरक्षण नाही. जेएलआर इन्शूरन्स घेण्याच्या प्रक्रियेत होता, मात्र त्यापूर्वीच हा हल्ला झाल्याचं इंडस्ट्री द इन्शूरन्सने खुलासा केला. त्यामुळे जेएलआरला आता संपूर्ण नुकसान स्वत:चं सहन करावं लागणार आहे. दरम्यान, असाच सायबर हल्ला एप्रिल महिन्यात मार्क्स अँड स्पेंसरवरही झाला होता, मात्र त्यांच्याकडे इन्शूरन्स असल्याने त्यांचं नुकसान कमी झालं होत.

टाटा मोटर्सच्या एकत्रित उत्पन्नात जेएलआरचा वाटा 70% इतका असल्याने जेएलआरला बसलेल्या या धक्क्याचा थेट परिणाम टाटा मोटर्सच्या बॅलेन्स शीट सोबतच गुंतवणूकदारांवर होईल. त्यामुळे आता कंपनीसाठी हे दुहेरी आव्हान आहे. एकीकडे, सायबर हल्ल्यामुळे उत्पादन विस्कळीत झाले आहे आणि दुसरीकडे, विमा संरक्षणाच्या अभावामुळे, संपूर्ण बिल त्यांना भरावे लागणार आहे.

कर्मचारी आणि डीलर्सवर थेट परिणाम

जेएलआरच्या इंग्लंडमधील 33 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना या सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. अनेक डीलर्सकडे कार रजिस्ट्रेशनची सुविधाही नाही. याशिवाय स्पेयर पार्ट्स ऑर्डर करण्याचा पर्यायही नाही. याशिवाय डायग्नोस्टिक सॉफ्टवेअ काम करीत नाही. म्हणजे दुरुस्तीही अवघड आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या डेटावरही या हल्ल्याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts