Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • आंतरराष्ट्रीय ऑनलाईन फसवणूक टोळीचा गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष–४ कडून पर्दाफाश
गुन्हा

आंतरराष्ट्रीय ऑनलाईन फसवणूक टोळीचा गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष–४ कडून पर्दाफाश

international online frod

international online fraud : मॅट्रीमोनिअल साईटसह विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधून विश्वास संपादन करून ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंग आणि गोल्ड ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय टोळीचा गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष– 4 यांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून देशभरातील तब्बल 51 गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग उघड झाला आहे.

काय आहे प्रकरण

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील शिवसाई रेसिडेन्सी लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंग येथे हा छापा टाकण्यात आला. या कारवाईत रोशनकुमार सिथारामा शेट्टी, साबिर मोहम्मद खान, सनद संजीव दास, राहुलकुमार उर्फ कैलाश राकेशकुमार आणि आमिर करम शेर खान हे आरोपी ऑनलाईन फसवणुकीतून मिळालेले पैसे अवैधरीत्या बँक खात्यांत स्वीकारत असल्याचे आढळून आले.

देशभरातील नागरिकांची फसवणूक

या तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी विविध मॅट्रीमोनिअल साईट्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून नागरिकांशी मैत्री करून विश्वास संपादन करत होता. त्यानंतर बनावट वेबसाईट्सच्या लिंक्स पाठवून फॉरेक्स व गोल्ड ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळेल, असे भासवून वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे भरण्यास भाग पाडले जात होते. या पद्धतीने देशभरातील अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.”

हे ही वाचा : हिदायत पटेल यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबीयांचे गंभीर आरोप; पोलिस तपास सुरू

51 गुन्हे उघडकीस

गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने वरिष्ठांच्या आदेशामुळे, गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष–4 कडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला. या तपासात अभिषेक अनिल नारकर ऊर्फ गोपाळ आणि मोहम्मद रशिद फकीर मोहम्मद बलोच ऊर्फ लक्की यांनाही अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बँक खात्यांच्या तपासातून महाराष्ट्रासह मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, जळगाव, धुळे तसेच मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधील विविध सायबर पोलीस ठाण्यांत दाखल असलेले 51 गुन्हे उघडकीस आले आहेत.

तपास सुरु

आतापर्यंतच्या तपासात देशभरातील सामान्य नागरिकांची 200 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार भारताबाहेरून कामकाज करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. अटक आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष–4 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts