Supriya Sule NOTA tweet : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बिनविरोध निवड ही लोकशाहीसाठी घातक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. NOTA चा पर्याय असूनही मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप त्यांनी लगावला असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत ट्विट करत संसदेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काय होती पोस्ट
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे काही घडत आहे, ते माझ्यासह राज्यातील जनतेच्या मनाला अस्वस्थ करणारे आहे. NOTA चा पर्याय उपलब्ध असूनही मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. यामध्ये धमकीचे प्रकार, बंदुकीच्या जोरावर दहशत, पैशांचा अतोनात वापर, उमेदवारी अर्ज माघारीसाठी विविध प्रकारचा दबाव, ब्लॅकमेलिंग, बोगस मतदान आणि मतदारांना दिली जाणारी प्रलोभने – असे अनेक गंभीर प्रकार माध्यमांतून सातत्याने समोर येत आहेत. आणि हे सर्व घडत असताना निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष अधिकच चिंताजनक आहे. अशा आशयाची पोस्ट त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे काही घडत आहे, ते माझ्यासह राज्यातील जनतेच्या मनाला अस्वस्थ करणारे आहे. तब्बल ७-८ वर्षांनंतर निवडणुका होत असतानाही मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडणुका होत आहेत. NOTA चा पर्याय उपलब्ध असूनही मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून…
— Supriya Sule (@supriya_sule) January 6, 2026
निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप
निवडणुकांदरम्यान धमकी, दहशत, पैशांचा वापर, उमेदवारी अर्ज माघारीसाठी दबाव, ब्लॅकमेलिंग, बोगस मतदान व मतदारांना दिली जाणारी प्रलोभने अशा गंभीर प्रकारांचे आरोप सुप्रिया सुळे यांनी केले. या प्रकारांकडे निवडणूक आयोगाचे होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक असून, ही स्थिती सुदृढ लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचा इशारा त्यांनी दिला. या विषयावर आपण यापूर्वीही संसदेत आवाज उठवला असून, लोकशाहीच्या संरक्षणासाठी पुढेही हा मुद्दा सातत्याने संसदेत मांडणार, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर चाकूहल्ला:अकोल्यात उपचारादरम्यान मृत्यू
लोकशाहीच्या संरक्षणासाठी काहीतरी करावे लागणार
तब्बल ७-८ वर्षांनंतर निवडणुका होत असतानाही मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडणुका होत आहेत. सुदृढ लोकशाहीसाठी हे अतिशय धोकादायक आहे. मी याबाबत यापूर्वीही संसदेत आवाज उठवला आहे, आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी पुढेही हा मुद्दा सातत्याने मांडत राहावे लागणार. NOTA चा पर्याय उपलब्ध असूनही मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.












