Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ४० दिवसांची कोठडी, सातवा गुन्हा दाखल; खरात अधिक अडचणीत, आज पुन्हा करणार न्यायालयात हजेरी
Top News

४० दिवसांची कोठडी, सातवा गुन्हा दाखल; खरात अधिक अडचणीत, आज पुन्हा करणार न्यायालयात हजेरी

Ashok Kharat Case: नाशिकमध्ये भोंदू म्हणजे ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्याविरोधातील प्रकरण अधिकच गंभीर होत चालले आहे. गेल्या चाळीस दिवसांपासून तो पोलीस कोठडीत असून या काळात त्याला तब्बल १४ वेळा न्यायालयासमोर उभे करण्यात आले आहे. त्याच्यावर नाशिक शहरात एकूण १२ गुन्हे दाखल असून सुरुवातीच्या या प्रकरणांची सध्या सुनावणी सुरू आहे.

रविवारी सहाव्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली; मात्र तत्काळ सातव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याला पुन्हा ताब्यात घेतले. त्यामुळे या नव्या गुन्ह्यासंदर्भात त्याला सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुरक्षा कारणांमुळे अनेकदा त्याची उपस्थिती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान न्यायाधीश त्याला काही सांगायचे आहे का, असे विचारतात; पण तो बहुधा शांत राहून केवळ नकारार्थी प्रतिक्रिया देतो. अलीकडे तो मानसिकदृष्ट्या खचलेला दिसत असल्याचेही निरीक्षण आहे.

हेही वाचा: यंदाच्या IPL हंगामात पहिल्यांदाच झाली सुपर ओव्हर; कोलकाताकडून लखनऊचा पराभव

पीडित महिलांच्या अडचणींचा फायदा घेत खरातने त्यांच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले असून, अशाच एका प्रकरणात त्याच्यावर सातवा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचा संबंध असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळल्यास कठोर कारवाई, अगदी बडतर्फीपर्यंतची, करण्यात येईल, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

तपासादरम्यान आणखी काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अत्याचार करण्यापूर्वी पीडित महिलांना गुंगी आणणारे पदार्थ दिले जात असल्याचा आरोप आहे. मात्र हे पदार्थ त्याला कुठून मिळत होते, याबाबत तो काहीही बोलण्यास तयार नाही. तसेच तो स्मृतिभ्रंशाचे नाटक करत असल्याचा युक्तिवाद सरकारी बाजूने करण्यात आला आहे. महिलांना तो नेमक्या कोणत्या पद्धतीने जाळ्यात ओढत होता, याबाबतही अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts