Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • डॉक्टरचा मृतदेह खिडकीला लटकलेल्या अवस्थेत; मैत्रिणीचं नवऱ्याशी संबंधांचा संशय
गुन्हा

डॉक्टरचा मृतदेह खिडकीला लटकलेल्या अवस्थेत; मैत्रिणीचं नवऱ्याशी संबंधांचा संशय

Dr Manisha Jejurkar Case
2

Dr Manisha Jejurkar Case : नाशिक मधील बहुचर्चित डॉक्टर मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाल आहेत. सहा मार्च रोजी डॉ मनीषा यांचा राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. मात्र घराच्या खिडकीला गळफास घेतलेला मृतदेह आढळल्याने ही आत्महत्या आहे की घातपात या संदर्भात संशय निर्माण झाला होता. मयत मनिषा यांच्या पती नंतर डॉ.निलेश यांची मैत्रीण जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ स्वाती चव्हाणला पोलिसांनी अटक केल्यानं ह्या प्रकरणाला वेगळच वळण मिळालं आहे.

डॉ. मनीषा जेजुरकर प्रकरणात मोठी कारवाई ( Dr Manisha Jejurkar Case )

डॉक्टर निलेश जेजुरकर ( Dr Nilesh Jejurkar ) यांना अटक केल्यानंतर पोलीस चौकशीत डॉक्टर स्वाती चव्हाण यांच्यासोबत प्रेम संबंध असल्याची कबूल दिल्याने स्वाती चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत डॉ. मनीषा यांच्या माहेरच्यांकडून तिचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. निलेश जेजुरकर यांच्यावर गुन्हा दाखल ही करण्यात आला होता मात्र याप्रकरणी निलेश जेजुरकर फरार होत त्यांनी नाशिक सत्र न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जामिन्यासाठी धाव घेतली.त्यांनी हायकोर्टात यांचा जामीन कोर्टाने नामंजूर केला आणि पोलिसांना शरण जाण्याचे निर्देश दिले होते आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणात निलेश जेजुरकर यांना पोलिसांनी अटक केली आणि निलेश जेजुरकर यांच्या अटकेनंतर डॉक्टर स्वाती चव्हाण यांना अटक केल्याने या प्रकरणाला एक वेगळं मिळाल आहे…

मार्च महिन्यामध्ये घडल्या घटनेनंतर या प्रकरणात डॉक्टर मनीषा जेजुरकर या चर्चेत असलेल्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आणि या प्रकरणी पोलिसांकडून या दोघांना अटक करत स्वाती चव्हाण यांचा मोबाईलही जप्त केला. डॉक्टर स्वाती आणि डॉक्टर निलेश यांच्यात प्रेम संबंध असल्याचा संशय पोलिसांना होता मात्र या सगळ्या प्रकरणात सलग नऊ वेळा डॉक्टर स्वाती यांची पोलिसांनी चौकशी केली होती. मात्र आता पुन्हा या सगळ्या प्रकरणांमध्ये ठोस कोणताही पुरावा नसल्याचा युक्तिवाद डॉक्टर स्वाती चव्हाण यांच्या वकिलांनी केला.

हेही वाचा : Lemon Chilli Vehicle Fine : गाडीला लिंबू-मिरची लावली तर 5 हजारांचा दंड? व्हायरल मेसेजमागचं सत्य समोर

डॉ. स्वाती चव्हाण यांच्यावर नेमके आरोप काय? ( Swati Chavan )

डॉ. मनीषा जेजुरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचे पती निलेश जेजुरकर यांना पोलिसांनी अटक केली होती आणि पोलिसांच्या चौकशी डॉक्टर स्वाती चव्हाण यांच्यासोबत प्रेम संबंध असल्याची कबुली पोलिसांना डॉक्टर निलेश यांनी दिली मात्र या सगळ्या प्रकरणांमध्ये तू तुझ्या नवऱ्याला आवडत नाही तुझं शिक्षण कमी आहे असे बोलून डॉक्टर स्वाती या डॉक्टर मनीषा जेजुरकर यांना टॉर्चर करत होत्या. आणि याच खेळातून त्यांनी आत्महत्या केलाचा आरोप कुटुंबाने केला आहे. मात्र या सगळ्या प्रकरणांमध्ये दोन्ही आरोपी पोलिसांनी जेरबंद केल्याने समोरासमोर या दोघांची चौकशी करायची आहे आणि या प्रकरणांमध्ये जे काही सीसीटीव्ही विडिओ आणि मोबाईल मधील डाटा रिकवरी नंतर दोघांमधील नेमके संबंध काय आणि डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी आत्महत्या केली की या दोघांनी डॉक्टर मनीषा यांचा काटा काढला यासंदर्भात खुलासा होईल अशा प्रकारची प्रतिक्रिया मयत डॉक्टर मनीषा यांच्या माहेरच्यांकडून करण्यात येत आहे.

पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासामध्ये आत्तापर्यंत डॉक्टर निलेश यांचे डॉक्टर मनीषा यांच्यासोबत कोणत्या कारणावरून सातत्याने वाद होत होते यासंदर्भात तपास केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर स्वाती ही आत्महत्येच्या दरम्यान घटनास्थळावर नेमकी काय करत होती आणि तिचे डॉक्टर मनीषा यांच्याशी नेमके काय संबंध होते आणि कोणत्या कारणासाठी ती वारंवार छळ करत होती, या सगळ्यांचा खुलासा पोलीस तपासातून होणार आहे. आज पुन्हा डॉ स्वाती चव्हाण यांना 3 वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आता न्यायालय या संदर्भात काय निकाल देतं याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts