India vs Australia T20 series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना रविवार, 2 नोव्हेंबर रोजी होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल इथं खेळवण्यात आला. या सामन्यात भारतानं पाच विकेट्सनं विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं दिलेलं 187 धावांचं लक्ष्य भारतानं 18.3 षटकांत पूर्ण केले. या विजयासह भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मालिकेतील चौथा सामना 6 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. मालिकेतील पहिला सामना पावसामुळं रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला होता.
हे ही वाचा – ICC Women’s World Cup : ‘डी वाय पाटील स्टेडियम’वर पावसाची तुफान बॅटिंग, सामना स्थगित होणार?
भारतीय संघाची शानदार कामगिरी
भारतीय संघाकडून धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये दिसत होता, पण त्याची खेळी जास्त काळ टिकली नाही. अभिषेक 25 धावांवर (16 चेंडू, 2 चौकार, 2 षटकार) नाथन एलिसच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर एलिसनं शुभमन गिल (15 धावा) आउट केला. कर्णधार सूर्यकुमार यादव (24 धावा) देखील टचमध्ये दिसत होता, पण त्यानंही त्याची विकेट फेकली. सूर्यकुमार तिसऱ्या विकेटसाठी बाद झाल्यानंतर, अक्षर पटेल (17 धावा) आणि तिलक वर्मा यांनी एकत्रितपणे धावसंख्या 100 च्या पुढं नेली. एलिसनं अक्षरला बाद केल्यानं ऑस्ट्रेलियाला मोठा विजय मिळाला. अक्षर पटेल बाद झाल्यानंतर, तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी पाचव्या विकेटसाठी 34 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तिलक 29 धावांवर झेवियर बार्टलेटच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर, वॉशिंग्टन सुंदर (49*) आणि जितेश शर्मा (22*) यांनी भारताला विजय मिळवून दिला.
Game. Set. Done ✅
Washington Sundar (49*) and Jitesh Sharma (22*) guide #TeamIndia to a 5-wicket victory in Hobart. 🙌
Scorecard ▶https://t.co/X5xeZ0LEfC #AUSvIND | @Sundarwashi5 | @jiteshsharma_ pic.twitter.com/gRXlryFeEE
— BCCI (@BCCI) November 2, 2025
ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर ऑस्ट्रेलियानं निर्धारित 20 षटकांत 6 गडी बाद 186 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. त्यांनी ट्रॅव्हिस हेड (6 धावा) आणि यष्टिरक्षक-फलंदाज जोश इंगलिस (1 धाव) यांचे बळी स्वस्तात गमावले. दोन्ही फलंदाजांना अर्शदीप सिंगनं बाद केलं. तेथून, टिम डेव्हिड आणि मिचेल मार्श यांनी तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी करुन डाव सावरला. यादरम्यान, डेव्हिडनं केवळ 23 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. डेव्हिडनं एकुण 38 चेंडूत 74 धावा केल्या, ज्यामध्ये आठ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. डेव्हिड बाद झाल्यानंतर, मार्कस स्टोइनिस आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी सहाव्या विकेटसाठी 64 धावा जोडल्या आणि ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या गाठण्यास मदत केली. भारताकडून अर्शदीप सिंगनं सर्वाधिक तीन बळी घेतले, तर वरुण चक्रवर्तीनं दोन बळी घेतले.











