Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • होळी खेळायचीये पण केस खराब होण्याचं टेन्शन आहे? घाबरू नका ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा अन् रंगांचा मनमुराद आनंद घ्या
ताज्या बातम्या

होळी खेळायचीये पण केस खराब होण्याचं टेन्शन आहे? घाबरू नका ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा अन् रंगांचा मनमुराद आनंद घ्या

Tips For Hair Care During Holi | काही दिवसांवर होळी (Holi) हा सण येऊन ठेपला आहे. त्यात होळी हा रंगांचा (Colours) सण आहे त्यामुळे प्रत्येकामध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. संपूर्ण देशभरात होळी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. पण आजच्या या केमिकलयुक्त जगात अनेक वस्तू भेसळयुक्त मिळत आहेत, ज्या आपल्या शरीरासाठी घातक ठरताना दिसत आहेत. यामध्ये होळीला मिळणारे रंग देखील केमिकलयुक्त (Chemical) मिळत आहेत. यामुळे बरेचजण आपल्या केसांना (Hair) हानी पोहोचेल म्हणून रंग खेळायचं टाळतात.

हेही वाचा – घरात या वस्तू कधीही ठेऊ नका रिकाम्या; अन्यथा नकारात्मकता निर्माण होण्यास लागणार नाही वेळ

केमिकलयुक्त रंगांनी होळी खेळली तर केस मोठ्या प्रमाणात डॅमेज होऊ शकतात. त्यात केस हा मुलींच्या खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे बऱ्याच मुली होळी खेळायला नकार देतात. पण मुलींनो आता टेन्शन घेऊ नका. खाली दिलेल्या काही सोप्या टिप्स फॉलो (Hair Care Tips) करून तुम्ही बिनधास्त होळी खेळा, ज्यामुळे तुमच्या केसांना हानी पोहोचणार नाही आणि ते मजबूत आणि छान राहतील.

होळी खेळताना फॉलो करा ‘या’ खास टिप्स

1. होळी खेळण्याच्या अगोदर केसांना तेल (Oil) लावा. जर तुम्ही केस कोरडे ठेवले तर घाम आल्यानंतर केसांमध्ये रंग चिटकून बसतो. त्यामुळे रंग खेळण्याच्या काही तास आधी खोबरेल तेल (Coconut Oil) लावा म्हणजे रंग मुळांपर्यंत पोहोचणार नाही आणि केस धुतल्यानंतर रंग लगेच निघेल.

2. होळी खेळताना केस मोकळे सोडू नका. अनेकजण फोटो, व्हिडीओ काढण्यासाठी आपले केस रिकामे सोडतात, पण तसं करू नका. जर तुम्ही केस रिकामे सोडले तर केसांमध्ये रंग खूप जास्त शिरतो आणि केस खराब होतात. त्यामुळे केस मोकळे न सोडता वेणी किंबा अंबाडा घाला.

3. होळी खेळून झाल्यानंतर जर तुमचे केस कोरडे फ्रीजी झाले तर घरगुती हेअर मास्क (Hair Mask) बनवा. दही Yogurt), कोरफडीचा गर (Alovera Gel) आणि शिकेकाई पावडर (Shikakai Powder) या तीन गोष्टी मिक्स करून तुमच्या त्याचा हेअर मास्क बनवा आणि तो तुमच्या केसांना लावा. 10-15 मिनिटांनंतर केस कोमट पाण्याने धूवा. यामुळे तुमचे केस मऊ, मजबूत होतील आणि केसांमधील रंगही जाण्यास मदत होईल.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts