Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • अमेरिकेला मोठा धक्का! युद्ध सुरू असताना KC-135 रिफ्युलिंग विमान क्रॅश, 5 जणांचा मृत्यू
Top News

अमेरिकेला मोठा धक्का! युद्ध सुरू असताना KC-135 रिफ्युलिंग विमान क्रॅश, 5 जणांचा मृत्यू

US KC-135 Refueling Plane Crash | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये युद्धाचा (War) भडका उडाला आहे. या युद्धादरम्यान आता अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. कारण इराणसोबत युद्ध सुरू असताना अमेरिकेच्या लष्कराचे एक रिफ्युलिंग विमान क्रॅश होऊन मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात पाच क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – इराणच्या हल्ल्यांविरुद्ध संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला भारताचा पाठिंबा

युद्धादरम्यान KC-135 रिफ्युलिंग विमानाचा मोठा अपघात

इराणमध्ये युद्ध सुरू असताना अमेरिकेचे KC-135 रिफ्युलिंग विमान कोसळले आहे. या विमान अपघातात पाच क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली आहे.

या अपघाताबाबत अमेरिकेच्या लष्कराने सांगितले की, आमची दोन KC-135 रिफ्युलिंग विमाने होती. त्यापैकी एक विमान सुरक्षितरित्या लँड झाले असून दुसरे विमान कोसळून त्याचा अपघात झाला आहे. हा अपघात शत्रूने केलेल्या हल्ल्यामुळे झाला आहे. ही घटना ऑपरेशन एपिक फ्युरीच्या दरम्यान मित्र राष्ट्राच्या हद्दीत घडली आहे. तसेच या अपघातानंतर बचाव कार्य सुरू असून पुढील तपास केला जात आहे, अशी माहिती अमेरिकेच्या लष्कराने दिली.

अमेरिकेने इराणविरोधात एपिक फ्युरी ऑपरेशन सुरू केले आहे. या ऑपरेशनसाठी अमेरिकेने KC-135 या विमानाचा वापर केला होता. अमेरिकेची KC-135 ही लढाऊ विमाने लांब पल्ल्याच्या मोहिंमासाठी आणि इतर विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी वापरली जातात. तर आताही इराणविरोधात सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकेने इतर लढाऊ विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी या विमानाचा वापर केला होता. तर हे विमान इराकमध्ये असताना त्याचा मोठा अपघात झाला. अपघात झालेले विमान 60 वर्षांपासून सेवेत होते. तर या विमानामध्ये पायलट, को पायलट आणि इंधन भरण्यासाठी असलेले कर्मचारी होते. या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.

युद्धादरम्यान अमेरिकेने 4 विमाने गमावली

दरम्यान, अमेरिकेने इराणसोबतच्या युद्धात आत्तापर्यंत आपली 4 विमाने गमावली आहेत. यामध्ये तीन लढाऊ विमानांचा अपघात झाला असून अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. ही तीन लढाऊ विमाने कुवैतमध्ये क्रॅश होत अपघात झाला होता. तर आता KC-135 या रिफ्युलिंग विमानाचा इराकमध्ये अपघात झाला असून अमेरिकेला मोठा झटका बसला आहे.

दरम्यान, इराणकडून अमेरिकेचे हवाई तळ असलेल्या देशातही हल्ला करण्यात आला आहे. अमेरिकेच्या पाचव्या युद्धनौकेवर इराणने हल्ला केला आहे या हल्ल्यात अमेरिकेची महत्त्वाची यंत्रणा नष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.

या हल्ल्याबाबत इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) स्पष्ट केले की, अमेरिकेच्या पाचव्या युद्धनौकेवर मोठा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये अमेरिकेच्या महत्त्वाच्या यंत्रणा नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच अमेरिकेच्या कतारमधील अल उदैद हवाई तळाला, इराकमधील हरिर हवाई तळाला आणि कुवेतमधील अरिफजान तळांना टार्गेट करण्यात आले आहे, असा दावा IRGC ने केला आहे.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts