Yugendra Pawar | राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा विमान अपघात होऊन एक महिना झाला आहे. तसेच अजितदादांचा अपघात (Ajit Pawar Plane Crash) होता की घातपात? असा सवालही निर्माण होताना दिसत आहे. कारण रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर केले होते, ज्यामुळे या अपघाताबाबत संशय निर्माण झाला होता. अशातच आज अजित पवारांचे पुत्र जय पवार (Jay Pawar) यांनीही सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे अजित पवारांचा खरचं घातपात होता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जय पवारांनंतर अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनीही एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – “ही एका मुलाची आर्त हाक,”; जय पवार यांनी भावनिक पोस्ट करत केली ‘ही’ मागणी
युगेंद्र पवारांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर अजित पवारांच्या विमानातला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये VSR कंपनीचे मालक रोहित सिंह (Rohit Singh) हा मुख्य पायलटच्या सीटवर बसलेला दिसत आहे. तर धक्कादायक गोष्ट म्हणजे विमान आकाशात असताना रोहित सिंह हा झोपलेला दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत युगेंद्र पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
VSR कंपनीच्या मालकाबाबत युगेंद्र पवारांनी व्यक्त केला संताप
युगेंद्र पवार यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, या व्हिडिओ मध्ये VSR कंपनीचे मालक रोहित सिंह हे स्वतः पायलट सीटवर बसून विमान सुरू असताना झोपलेले दिसत आहेत. हे अतिशय गंभीर असून यातून प्रवाशांच्या सुरक्षाबाबतचा निष्काळजीपणा समोर येत आहे. हा व्हिडिओ माझे बंधू जय पवार यांनी समोर आणला असून यातून VSR कंपनीचा मोठा हलगर्जीपणा स्पष्टपणे समोर येत आहे.
केंद्र सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून सखोल चौकशी करावी, या कंपनीची सर्व विमान उड्डाणे तत्काळ स्थगित करावीत तसेच कंपनीचे मालक व सर्व संचालकांवर त्वरित गुन्हे दाखल करावेत, ही आमची सर्वांची ठाम मागणी आहे, असं युगेंद्र पवार म्हणाले.
या व्हिडिओ मध्ये VSR कंपनीचे मालक रोहित सिंह हे स्वतः पायलट सीटवर बसून विमान सुरू असताना झोपलेले दिसत आहेत. हे अतिशय गंभीर असून यातून प्रवाशांच्या सुरक्षाबाबतचा निष्काळजीपणा समोर येत आहे.
हा व्हिडिओ माझे बंधू जय पवार यांनी समोर आणला असून यातून VSR कंपनीचा मोठा हलगर्जीपणा… pic.twitter.com/kRvqH9U5N8
— Yugendra Shrinivas Pawar (@yugendraspeaks) March 2, 2026
दरम्यान, युगेंद्र पवार यांच्याआधी जय पवार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे… माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी, अशी मागणी जय पवार यांनी केली आहे.












