Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “तो चक्क झोपलेला…”; अजित पवारांच्या अपघातादरम्यानचा धक्कादायक व्हिडिओ जय पवारांनी केला शेअर, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
Top News

“तो चक्क झोपलेला…”; अजित पवारांच्या अपघातादरम्यानचा धक्कादायक व्हिडिओ जय पवारांनी केला शेअर, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

Ajit Pawar Accident Video | राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघात झाला होता. अजित पवारांच्या अपघातानंतर (Ajit Pawar Plane Crash) तो खरच अपघात होता की घातपात होता? अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत. अशातच अजित पवारांच्या अपघाताला एक महिना उलटल्यानंतर आता त्यांचे पुत्र जय पवार (Jay Pawar) यांनी एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – अजित पवार यांचा अपघात नाही तर 100 टक्के घातपात, राज्यातील मोठ्या नेत्याचे वक्तव्य

जय पवार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, VSR कंपनीचे मालक रोहित सिंह (Rohit Singh) हा मुख्य पायलटच्या सीटवर बसलेला दिसत आहे. तर धक्कादायक गोष्ट म्हणजे विमान आकाशात असताना रोहित सिंह हा झोपलेला दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत जय पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

जय पवार यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, “माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCA ला ठामपणे मागणी करतो या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे… माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी”, अशी मागणी जय पवार यांनी केली आहे.

दरम्यान, रोहित पवारांनी शेअर केलेल्या या धक्कादायक व्हिडिओनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. तसेच आता जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओनंतर दोषींवर कारवाई होणार का? असा सवाल सद्या उपस्थित केला जात आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts