Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • बीडमध्ये थरारक घटना! 12 फूट खोल ड्रेनेजच्या खड्ड्यात माय-लेकी कोसळल्या
ताज्या बातम्या

बीडमध्ये थरारक घटना! 12 फूट खोल ड्रेनेजच्या खड्ड्यात माय-लेकी कोसळल्या

Beed drainage accident

Beed drainage accident : बीड जिल्ह्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. अंबाजोगाई शहरातील (Ambajogai City) स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयाच्या परिचारिका निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) अक्षम्य दुर्लक्षामुळे एक थरारक घटना (A Thrilling Incident) घडली. रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या ड्रेनेजच्या खड्ड्यात (drainage accident) माय-लेकी कोसळल्या. सुदैवाने, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे या दोघींचे प्राण वाचले असून मोठा अनर्थ टळला आहे.

हेही वाचा – अशोक खरातच्या बंगल्यावर एसआयटीची धाड; पत्नी फरार, मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, नर्सेस क्वार्टरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेजचा खड्डा गेल्या काही दिवसांपासून उघडा आहे. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एक महिला आपल्या लहान मुलीसह स्कुटीवरून या रस्त्याने जात होत्या. अंधारामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला आणि माय लेकी थेट १२ फूट खोल ड्रेनेजमध्ये कोसळल्या. गाडी पडल्याचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत शिताफीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून या माय-लेकींना खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही, मात्र या घटनेमुळे त्या प्रचंड दहशतीखाली आहेत.

हा रस्ता रुग्णालयातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वर्दळीचा आहे. भरवस्तीत आणि मुख्य रस्त्यावर इतका मोठा खड्डा उघडा असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग झोपा काढत आहे का?, का एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल? अशा शब्दांत स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी साधा इशारा देणारा बोर्ड किंवा बॅरिकेड्सही नसल्याने हा ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. आता तरी संबंधित विभाग हा खड्डा तातडीने बुजवून रस्ता सुरक्षित करणार की आणखी मोठ्या अपघाताची वाट पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts