Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • बीफ कंपनी कुणाची? इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरवर गडकरींनी ठोकला 50 कोटींचा दावा!
Top News

बीफ कंपनी कुणाची? इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरवर गडकरींनी ठोकला 50 कोटींचा दावा!

Nitin Gadkari defamation case

Nitin Gadkari defamation case : महाराष्ट्राचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भोवती एक वाद सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आहे. एका बीफ कंपनीचा आणि गडकरी कुटुंबाचा नेमका काय संबंध आहे? याची चर्चा यानिमित्तानं सुरु आहे. जर तुम्हाला या देशात खरं बोलायचं असेल ना, तर आधी ५० कोटी रुपये खिशात ठेवा! कारण सध्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची एका केंद्रीय मंत्र्याला एवढी भीती वाटलीय? की थेट त्याच्या कंपनीवर ५० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला!

प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक आवाजाला दिलेली ‘धमकी’

विषय गंभीर आहे… ‘द कारवाँ’ने रिपोर्ट छापला की नितीन गडकरींच्या कंपनीतून ‘बीफ’ एक्सपोर्ट होतंय. मग केस मोठ्या मॅगझिनवर का नाही? आणि एका साध्या बहुजन तरुणाला, मुकेश मोहनला ‘सॉफ्ट टार्गेट’ कशासाठी? हा ५० कोटींचा दावा म्हणजे फक्त दंड नाही, तर प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक आवाजाला दिलेली ‘धमकी’ आहे! जर आज आपण गप्प बसलो, तर उद्या आपलं तोंड दाबायला यांना वेळ लागणार नाही, अशा प्रतिक्रिया या प्रकरणावर सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.

मुलावर ५० करोडची मानहानीची केस दाखल

एक साधारण कन्टेन्ट बनवणारा मुलगा.. जी माहिती माध्यमातून मिळते, बातम्यांमधून मिळते त्याचाच आधार घेऊन त्यावर व्हिडिओ बनवणे हा त्याचा छंद.. त्या मुलाचं नाव आहे.. मुकेश मोहन..! गेल्या दोन दिवसांमध्ये तुम्ही हे नाव reels वर म्हणा किंवा अन्य मंडळींच्या चॅनेलवर ऐकलंच असेल. ह्या मुकेश मोहन नावाच्या मुलावर ५० करोडची मानहानी असणारी केस दाखल झालिये. अन् ही केस दाखल केलीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी.

सोशल मीडियावर ह्या गोष्टीचा निषेध अन खळबळ

त्यामुळं संपूर्ण सोशल मीडियावर ह्या गोष्टीचा निषेध अन खळबळ माजलेली आपल्याला दिसून येतेय. मुकेशने नितीन गडकरींच्या विरोधात अशी कोणता व्हिडिओ केलीय? ज्यामुळं नितीन गडकरी यांनी मुकेश मोहनवर ५० कोटींचा मानहानीचा दावा केला? हा संपूर्ण वाद काय आहे? त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय होतं? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत…

गोमांस घेऊन जाणारा एक ट्रक जप्त

मुकेश मोहन नावाच्या एका इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरने त्याच्या एका रीलमध्ये दावा केला आहे की नितीन गडकरी गोमांस विकतात. त्याच्या रीलमध्ये त्याने म्हटले आहे, “महाराष्ट्र पोलिसांनी रॅम्बल ॲग्रो अँड फूड्सचा गोमांस घेऊन जाणारा एक ट्रक जप्त केला आहे. ‘द कॅराव्हॅन’ मासिकातील एका वृत्तानुसार, ही कंपनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्या मालकीची आहे. ”व्हायरल व्हिडिओने केवळ अहवालातील निष्कर्षांचं विश्लेषण किंवा त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, तर त्याही पुढे जाऊन संपूर्ण दावाच “सत्य” म्हणून मांडला. त्यात असा दावा करण्यात आला होता की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गोमांस विकणाऱ्या एका कंपनीशी संबंध आहेत, ज्याला इन्फ्लुएन्सर मोहनने “गाईचे मांस” असे संबोधले होते.

गडकरी यांचे कुटुंबीय कृषी कंपन्यांशी जोडलेले

गडकरींची बीफ कंपनी हा विषय सध्या सोशल मीडियावर आणि काही रिपोर्ट्समध्ये चर्चेत आहे. पण यात तथ्य आणि आरोप वेगळे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. नितीन गडकरी यांचे कुटुंबीय काही कृषी संबंधित कंपन्यांशी जोडलेले आहेत. एका मासिकाच्या रिपोर्टमध्ये एका कंपनीचा मांस वाहतूक प्रकरणाशी संबंध जोडला गेला. त्या रिपोर्टमुळे असा दावा केला गेला की “बीफ कंपनी” कनेक्शन आहे. मात्र गडकरी यांच्या मुलाच्या कंपनीने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. कंपनी फक्त भाजीपाला, मसाले, तेल यासारख्या अॅग्रो प्रोडक्टमध्ये काम करते.. मांस/बीफशी कोणताही संबंध नाही.. त्यामुळे या आरोपांवरुन त्यांनी 50 कोटींची मानहानीची नोटीस पाठवलीय.

पण यावरून आता सोशल मीडियावर जोरदार वॉर रंगलंय, सरकार आणि त्यांच्या मंत्र्याविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातो, त्यांच्यावर खोट्या केसेस टाकल्या जातात, त्याच्यावर दावे ठोकले जातात, त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवलं जाऊ शकतं, असा आरोप होऊ लगालाय, त्यामुळे हे बीफ प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरतंय. यावरून दोन्ही बाजुंनी मतं व्यक्त केली जातायत. त्यामुळे या 50 कोटी दावा प्रकरणाकडे सध्या देशाचं लक्ष लागलंय.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts