Amla vs Aloe Vera for hair : आपण आपल्या चेहऱ्यासोबतच केसांची काळजी घेणे देखगील गरजेचे आहे. ज्या प्रमाणे आपल्या शरीराला न्यूट्रिशन्स मिळणे गरजेचे असते त्याचप्रमाणे केसांच्या आरोग्यासाठी देखील न्यूट्रिशन्स फायदेशीर असतात. आपण बऱ्याचदा केसांच्या आरोग्यासाठी विविध केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरात असतो. परंतु यामुळे केसांच्या आरोग्यात भर पडण्यापेक्षा केस गळतीचा सामना करावा लागतो. या केस गळती पासून वाचण्यासाठी मग आपण नैसर्गिक औषोधोपचाराचा सहारा घेतो. मग तुम्हाला प्रश्न पडत असेल कि, नैसर्गिक औषधोपचारात केसांसाठी एलोवेरा बेस्ट आहे कि आवळा ? मग जाणून घेऊया दोन्ही पैकी नेमके बेस्ट कोणते ? आणि दोन्हीचे वापरण्याचे फायदे कोणते ?
आवळ्याचे फायदे (Amla vs Aloe Vera for hair)
आवळा या आयुर्वेदिक फळामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी ऑक्सीडंट्स, लोह आणि केसांसाठी उपयुक्त असणाऱ्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. याचे सेवन करणे देखील फायदेशीर ठरते. आवळा केसांना लावल्यास केसगळती कमी होऊन स्कॅल्पच्या भागातील रक्तप्रवाह वाढतो. आवळ्याचे तेल, आवळा पावडरचा वापर देखील तुम्ही केसांना लावण्यासाठी करू शकतात. तर सेवनासाठी आवळ्याचा ज्युस देखील पिऊ शकतात.
एलोवेराचे फायदे
एलोवेरा म्हणजे कोरफड तुमच्या स्कॅल्पला थंडावा मिळवून देऊ शकते. कोरफड मध्ये व्हिटॅमिन आणि एंझाइम्समुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. केस वाढण्यासाठी देखील कोरफड फायदेशीर ठरते. तसेच स्कॅल्पसाठी कोरफड हायड्रेट ठेवण्याचे काम करते.
आवळा vs अॅलोव्हेरा
कोरफड आणि आवळा या दोघांचे विविध फायदे आहे. यामुळे केसांना वेगवेगळे फायदे मिळतात. आवळ्यातील पोषणतत्त्वे केस मजबूत करण्यास आणि घनदाट होण्यास मदत करतात. यामुळे केसगळतीची समस्या देखील नाहीशी होते. कोरफड ही स्कॅल्पचा भाग स्वच्छ आणि थंड करण्यासाठी मदत करतो. यामुळे नवीन केस येण्यासाठी देखील फायदा होतो. त्यानुसार जर तुम्हाला केस गळतीची केस पातळ होण्याची समस्या असेल तर केसांना आवळ्याचा वापर करा. आणि जर स्कॅल्पला खाज येत असेल, केसांमध्ये कोंडा झाला असेल तर कोरफडचा वापर करा.
अशा पद्धतीने करा आवळ्याचा वापर (Amla vs Aloe Vera for hair)
केसांसाठी आवळ्याचा वापर करण्यासाठी महिन्यातुन एक किंवा दोन वेळेस आवळ्याचे तेल केसांना वापरा. तुम्ही आवळ्याचे तेल हलकेसे गरम करून स्कॅल्पवर लावू शकतात. आणि त्यानंतर केसांची मसाज करा. त्यानंतर अर्ध्या तासांनी केस स्वच्छ धुवून घ्या. आवळा पावडर आणि दही हे मिश्रण एकत्र केल्यास तयार होणार हेअरमास्क तुम्ही वापरू शकतात.





