Benefits of beet juice in winter : बीट हे आरोग्यासाठी पोषक मानलं जातं. हे कंदमूळ हिवाळ्यात बाजारपेठेमध्ये प्रचंड प्रमाणात दिसतात. बीट या कंदमूळाचे आहारात सेवन करणे अत्यंत फायदेशीर मानलं जातं. जर आपण दैनंदिन जीवनात बीटच्या रसाचा समावेश केल्यास शरीरासाठी विविध फायदे होतात. कारण बीट या कंदमूळामध्ये मॅगनीज पोटॅशियम लोहफोलेट विटामिन बी 6 आणि व्हिटॅमिन सी यासारख्या कित्येक पोषण तत्त्वाचा समावेश आहे. त्यामुळे जर तुम्ही सलग 15 दिवस बीट या कंदमुळाचे ज्यूस पिले तर शरीरात होणारे बदल तुम्हाला आश्चर्यचकितच करतील. चला तर मग जाणून घेऊया बीट ज्यूसचे सेवन करण्याचे मोठे फायदे आणि कोणत्या लोकांसाठी आहे हे फायदेशीर औषध.
रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर

बीटमध्ये नायट्रेट्स नावाचा घटक असतो. जो शरीरात गेल्यावर नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढवते. यामुळे रक्तवाहिन्या सैल होण्यास मदत होते. आणि रक्तप्रवाह देखील सुरळीत राहतो. रक्तदाब देखील कमी होते. ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब यासारख्या समस्या आहेत त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास बीट ज्यूसचे सेवन केल्यास ब्लड प्रेशर 5 ते 10 पॉईंट ने कमी होण्यास मदत होईल. आणि 15 दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल.
मेहनत करणाऱ्या व्यक्तींसाठी फायदेशीर
बीट ज्यूस चे सेवन केल्यास ऑक्सिजनचा प्रवाह वाढण्यास मदत होते. यामुळे खेळाडू किंवा जिमला जाणाऱ्या व्यक्तींसाठी बीट ज्यूस हे नॅचरल एनर्जी ड्रिंक आहे. बीट मध्ये असलेले नायट्रेट स्नायूंना अधिक काळ काम करण्याची क्षमता देतात. दिवसभर मेहनत करणाऱ्या व्यक्तींसाठी बीट ज्यूस हे अत्यंत फायदेशीर आहे. 15 दिवस सलग बीटाचे ज्यूस पिल्यानंतर थकवा कमी होण्यास मदत होते. व्यायाम करताना दम लागत नाही. दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
रक्तप्रवाह सुधारण्यासाठी फायदेशी
माणसाचे जसे जसे वय वाढत जाते तसं मेंदूतील रक्त प्रवाह देखील कमी होत जातो. त्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती देखील कमी होते. अशावेळी बीट ज्यूस मेंदूकडे जाणाऱ्या रक्त प्रवाहात सुधारणा करतो आणि मेंदूला अधिक ऑक्सिजन देण्यास मदत करतो. बीट ज्यूस चे रोज सेवन केल्यास काँग्रेटीव्ह फंक्शन सुधारण्यास मदत फायदा होतो. यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता देखील वाढते. याचा फायदा विद्यार्थी जास्त कामाचा ताण असणारे कर्मचारी आणि वयोवृद्ध व्यक्तींसाठी होतो.

त्वचेसाठी फायदेशीर
बीट हे आयुर्वेदात रक्तवर्धक औषधे म्हणून ओळखलं जातं. कारण बीटमध्ये लोह फोलेट विटामिन सी आणि मॅग्नेशियम हे घटक असतात. हे घटक शरीरामध्ये नवीन रक्तपेशी तयार करण्यासाठी मदत करतात आणि ॲनिमिया कमी करण्यास फायदेशीर असतात. जर तुम्ही 15 दिवस बीटचे ज्यूस पिल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबीपणा येतो. त्वचा मऊ आणि चमकदार राहते. रक्त शुद्ध होतो आणि पिंपल्स देखील कमी होतात. ज्या महिलांना रिमोग्लोबिन कमी आहे त्यांच्यासाठी आणि किशोरवयीन मुलींसाठी हे बीट चे ज्यूस फायदेशीर आहे.
लिव्हर शुद्ध करण्यास फायदेशीर
बीट या कंदमुळात बिटाईन नावाचा एक नैसर्गिक घटक असतो. ज्यामुळे लिव्हर मधील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. जर तुमचे लिव्हर नीट काम करत नसेल तर शरीरात टॉक्सिन्समुळे पचन बिघडते. बीट ज्यूस चे सेवन केल्यास लिव्हर शुद्ध करण्यास मदत होते पचन सुधारते आणि त्वचेवरचा तेलकटपणा देखील कमी होतो. ज्या व्यक्तींचे पचन कमजोर आहे किंवा जास्त जंक फूड तेलकट पदार्थांचा सेवन करणाऱ्यांसाठी हे ज्यूस फायदेशीर ठरेल.

अशा पद्धतीने तयार करा बीट ज्यूस
एक मोठे बीट घ्या. त्यासोबत एक लहान गाजर आणि अर्धी सफरचंद अर्ध लिंबू आणि चिमूटभर मीठ घ्या. सर्व घटक मिक्सरमध्ये एकत्र करून त्याचा रस करा. हे मिश्रण फ्रीजमध्ये न ठेवता लगेच प्या. कारण बीट ज्यूस हा ताजा आणि सर्वाधिक पौष्टिक मानला जातो.
कोणी सेवन करू नये (Benefits of beet juice in winter)
ज्या व्यक्तींना किडनी स्टोन आहे त्या व्यक्तींनी बीट ज्यूस चा सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण बीटमध्ये ऑक्सलेट जास्त प्रमाणात असतात. रक्तदाब जर कमी असेल तर त्यांनी ज्यूस जास्त प्रमाणात पिऊ नये. मधुमेही रुग्णांनी क्वचितच बीट ज्यूसचे सेवन करावे.









