Winter Bathing Hot or Cold Water : एरवी थंड पाण्याने अंघोळ करणे काही व्यक्तींना सवय असते. मात्र, हिवाळ्यात थंड पाण्यामुळे शरीराची त्वचेला कडकपणा येऊ लागतो. त्यामुळे अनेकजन हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करावी की गरज या द्विधा मनस्थितीत असतात. मात्र, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कोणत्या पाण्याने अंघोळ करणे योग्य राहिल हे आज आपण पाहणार आहोत.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, व्यावहारीक ज्ञानाला अधिक महत्त्व असते. जर बाहेर एकदम थंडगार वातावरण असेल आणि छतावरील अति थंड पाण्याने तुम्ही अंघोळ करत असाल तर मग हा शहाणपणा ठरत नाही. अशावेळी हट्ट न करता कोमट अथवा हलक्या गरम पाण्याने अंघोळ करणे चांगले राहते. यामुळे त्वचाही नरम राहते. तसेच सर्दी-पडसं, पायात गोळे येणे अथवा इतर आजार उद्धभवत नाहीत. त्यामुळे एकंदरीत थंडीच्या दिवसांत कोमट अथवा गरम पाण्याचे अंघोळ करणं शहाणपणाचं ठरेल.
हेही वाचा – हिवाळ्यात व्यायाम करताना घ्या ही काळजी; हा व्यायाम ठरेल फायदेशीर
हिवाळ्यात अति थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीराला धक्का बसतो..
हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करावी की गरम पाण्याने असा जर मनात संभ्रम असेल तर तो लागलीच दूर करा. कारण तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या दिवसात थंड पाण्याने अंघोळीचा विचारच अंगावर काटा आणतो. पण थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीर सक्रिय होते. रक्ताभिसरण वाढते. यामुळे प्रतिकार शक्ती वाढते. कारण पांढऱ्या पेशी लवकर सक्रिय होतात. पण हिवाळ्यात अति थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीराला धक्का बसतो.
एकदम थंड पाण्याने अंघोळ करणे टाळणेच योग्य
यामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. यामुळे रक्तदाब वाढतो. हृदयाची गती वाढते. एकदम थंड पाण्याने अंघोळ करणे टाळणेच योग्य असते. हलक्या गरम पाण्याने अंघोळ करणे चांगले आहे. अथवा अंघोळीपूर्वी जर तुम्ही व्यायाम करत असाल तर शरीर गरम होते आणि त्यात घरातील साध्या पाण्याने अंघोळ केल्यास तितका त्रास होत नाही. काहींना थंड पाण्याने अंघोळ केल्यास सर्दी-ताप असा त्रास होऊ शकतो, त्यामुळे थंडीच्या दिवसांत गरम पाण्याने अंघोळ करणं टाळाव.
थंड पाण्याने अंघोळ केली तर आजारी पडण्याची शक्यता
थंडीचा कडाका येत्या काही दिवसातच सुरू होईल. थंडीच्या कडाक्यात सकाळी अंघोळ करणे म्हणजे युद्धावर जाण्यासारखं अनेकांना वाटतं. हिवाळ्यात सकाळी पाण्यात हात टाकावा वाटत नाही. कारण अनेकांच्या पाण्याच्या टाक्या या गच्चीवर असतात आणि हिवाळ्यात यातील पाणी अत्यंत थंड होते. मग अशावेळी हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे की गरम पाण्याने अंघोळ करणे फायद्याचे आहे, असा प्रश्न अनेकांना सतावतो. कारण हिवाळ्यात जर थंड पाण्याने अंघोळ केली तर आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.
थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे सूख काही औरच असते. गरम पाण्याने अंघोळ केल्याने काही काळ थंडी दूर होते. शरिरातील स्नायूंना आराम पडतो. रक्त प्रवाह सुधारतो. एकदम फ्रेश वाटल्यासारखं वाटतं. गरम पाण्याच्या वाफेमुळे नाक मोकळं होतं. तर या गरम पाण्याच्या गुळण्या केल्या तर घसाही साफ होतो. त्यामुळे हिवाळ्यात अगोदर गरम पाण्याने अंघोळ करण्याचा अनेकांचा आग्रह असतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक रिसर्च अँड इंजिनिअरिंग डेव्हलपमेंटच्या एका अहवालानुसार, अत्यंत उष्ण पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होते. कोरडेपणा, शुष्कपणा वाढतो आणि मग त्वचेची आग होते. खाज सुटते.









