Vikas Khanna fitness mantra : शेफ विकास खन्ना हे नाव प्रत्येकाच्या ओळखीत आहे. त्यांना फक्त भारतच नाही तर पाककलेतील कौशल्यांसाठी जगभरात ओळखले जाते. शेफ विकास खन्ना हे मिशेलिन तारांकित शेफ आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या सर्वांना कलेने प्रभावित केले असून ते चित्रपट निर्माते देखील आहेत. त्यांनी भारतीय पाककृतींचा वारसा जागतिक स्तरावर पसरवला आहे. ते खवये असून सुद्धा एवढे फिट आणि तंदुरुस्त कसे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जाणून घेऊया त्यांच्या फिटनेसचा तंदुरुस्त राहण्याचा मंत्र
शेफ विकास खन्ना यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या फिटनेस आणि खाण्याबद्दलच्या सवयीबद्दल सांगितले होते. 53 व्या वर्षी त्यांनी शिस्तबद्ध दिनचर्या तयार केली. ते म्हणतात की, मी अत्यंत शिस्तबद्ध असल्यामुळे मी फिट आहे. मी एका वेळी एकच काम करतो. जेणेकरून मला शिस्तबद्ध राहण्याचे स्वातंत्र्य मिळते. तसेच दैनंदिन जीवनात व्यायाम करणे, पुशअप तसेच आहाराची काळजी मी घेत असतो. यामुळे मी शिस्तबंद आणि फिट राहतो. त्यांनी फॉक्स न्यूज च्या नताशा वर्मा यांच्या पॉडकास्ट मध्ये या गोष्टीचा खुलासा केला.
जाणून घेऊया त्यांची सकाळ कशी होते (Vikas Khanna fitness mantra)
शेफ खन्ना सकाळी आहारात ग्रॅनोला, दोन उकडलेले अंडे आणि कॉफी सह सुख्या मेव्याचे देखील सेवन करतात. ते म्हणतात, मी सकाळी नाश्ता झाल्यानंतर जेवल्याशिवाय घरा बाहेर पडत नाही. बाहेर कधी कधी रेस्टॉरंट मध्ये जेवण करण्यात येते परंतु घरी स्वयंपाक केल्यानंतर शरीर आणि मन दोघेही सर्वोत्तम राहते. त्यामुळे घरी स्वयंपाक बनवन्यास मी जास्त प्राधान्य देतो.
हे हि वाचा : विनोदी अभिनेते सतीश शहा यांचे निधन; बॉलीवूडवर शोककळा
सकाळी नाश्ता केल्यामुळे दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला मायक्रोन्यूट्रियन्स मिळतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. आणि शरीराला न्यूट्रीशियन्स मिळतात. तसेच दिवसभर तुमची मानसिक आणि शारीरिक कार्यक्षमता देखील स्थिर राहते. सकाळी नाश्ता मध्ये ग्रानेलो अंडी आणि काजू खाल्ल्याने काजू मधील प्रथिने स्नायूंच्या दुरुस्तीसाठी मदत करतात. तर ग्रॅनोला जटिल कार्बोहायड्रेट्स फायबर प्रदान करतात.
प्रत्येक गोष्ट अगोदरच मोजून तयार करण्याची सवय लावली की जीवनात स्थिरता मिळते. आणि नाश्त्याला काय खावे हा ताण कमी होतो. फिटनेस साठी सायकलिंग हा योग्य पर्याय आहे. हा एक उत्कृष्ट कार्डिओ व्यायाम असून जया पचनास तो मदत करतो. जिम मध्ये वेळ न घालवता सायकलिंग द्वारे तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकतात.






