military sleep method : आजकाल प्रत्येक व्यक्ती हा पैसे कमवण्यासाठी स्वतःच घर चालवण्यासाठी धावपळ करत असतो. या धावपळीच्या आणि गॅझेट्स ने व्यापलेल्या जगात झोप ही सर्वात मोठी लक्झरी झाली आहे. बऱ्याच व्यक्तींना झोप लागण्यासाठी खूप वेळ वाट पहावी लागते. कारण मनात रात्री बेडवर झोपण्यासाठी आल्यावर देखील विचारांची गर्दी सुरूच असते. ऑफिसचं काम, नाती, नातेसंबंध, सोशल मीडिया हाताळत झोपण्याची सवय या सर्व गोष्टींमुळे झोपही नाहीशी होते. आणि मग आपण म्हणतो झोपच लागत नाही. मग अशावेळी अमेरिकन सैन्यात असलेली एक पद्धत जोपासावी वाटते. जेणेकरून दोन मिनिटात गाढ झोप येईल.

मिलिटरी स्लिप टेकनिक
ही टेक्निक म्हणजे अमेरिकन नेव्ही फ्लाईट स्कूलमध्ये पायलट साठी विकसित करण्यात आलेली टेक्निक आहे. युद्धाच्या वेळी तणाव, गोळीबाराच्या आवाजात सुद्धा त्यांना झोप लागावी यासाठी ही पद्धत वापरली जाते. चला तर मग जाणून घेऊया त्या मागचे विज्ञान.

शरीर रिलॅक्स करणे
आपल्याला झोप येण्यासाठी सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे शरीराला आराम देणे. बरेचदा आपण झोपताना चेहऱ्यावर खांद्यावर पाठीवर किंवा पायांमध्ये ताण धरलेला असतो. या ताणामुळे मेंदू सक्रिय राहतो आणि झोप येत नाही. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही झोपेच्या अवस्थेत या. त्यानंतर तुमची डोळे बंद करा. मग कपाळ डोळे आणि जबडा रिलॅक्स करा. त्यानंतर पाय आणि हातांमध्ये ताण सोडा. म्हणजेच तुम्ही संपूर्ण शरीर रिलॅक्स व्हाल. आणि तुम्हाला दोन मिनिटांच्या आत झोप येईल.
या पद्धती नुसार झोपण्याचा प्रयत्न केला तर मेंदूला सुरक्षितता आणि आराम असा सिग्नल मिळतो. म्हणून मेंदूतील ताण कमी होतो आणि झोपेची हार्मोन सक्रिय होतात.
ब्रीदिंग टेक्निकचा वापर
आपला श्वास वेगवान असेल तर मेंदूला असे वाटते की अजून ताण-तणाव आहे. परंतु हळूहळू किंवा खोल श्वास घेतल्याने पॅरासिंपथेटिक नर्वस सिस्टिम सक्रिय होते. आणि यामुळे शरीर रिलॅक्स राहते. या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी नाकाने हळूहळू श्वास घ्या. त्यानंतर सात सेकंदांसाठी श्वास रोखून धरा. आणि नंतर तोंडाने हळूहळू श्वास सोडा. ही ब्रीदिंग टेक्निकचा वापर केल्यास काहीच वेळात हृदयाचे ठोके मंदावतात आणि विचार शांत होतात. आणि लवकर झोप येण्यास मदत होते.

डोन्ट थिंक टेक्निक (military sleep method)
दिवसभर थकल्यानंतर रात्री झोपताना डोक्यात सतत विचार सुरू असतात. उद्याचं काम, कालचे प्रॉब्लेम्स, फोनवर नोटिफिकेशन या सर्व गोष्टींमुळे झोप लागत नाही. आणि खास करून मोबाईलची सवय लागल्यामुळे झोपेचा सर्वात मोठा शत्रू हा मोबाईल बनला आहे. अशावेळी मिलिटरी पद्धतीचा अवलंब करून दोन मिनिटात झोप आणण्याची ही पद्धत अतिशय अप्रतिम आहे.
If you can clear your mind for 10 second you can sleep anywhere हे मिलिटरी पद्धतीमध्ये सैनिकांना शिकवलं जातं. त्यानुसार बेडवर झोपून स्वतःला शांत जागी असल्याची कल्पना करा. त्यानंतर अजूनही विचार मनात सुरू असतील तर डोन्ट थिंग डोन्ट थिंग असं म्हणा. आणि काही सेकंदात मेंदू हळूहळू शांत होईल आणि शांत झोप लागेल.

ही मिलिटरी स्लिप टेक्निक पहिल्यांदा US Navy preplied School या ठिकाणी विकसित करण्यात आली होती. जेव्हा पायलट्स ला युद्धाच्या परिस्थितीमध्ये झोप घेणे अवघड आणि अशक्य वाटत होते तेव्हा या पद्धतीचा अवलंब करण्यात आला. झोप न घेतल्यास निर्णय क्षमता देखील आपली कमी होत असते आणि लक्ष ही विचलित होतं. आणि झोप न झाल्यामुळे जीव धोक्यातही येतो त्यामुळे या टेक्निकचा वापर करून दीड ते दोन मिनिटात पायलटला झोप येते.
https://lokshevay.com/wp-content/uploads/2025/11/299.jpg
या पद्धती शिवाय तुम्ही काही टिप्सचा वापर करून देखील तुमची झोप नियंत्रणात आणू शकतात. जसं की , झोपेच्या एक तास अगोदरच स्क्रीन टाईम टाळा. झोपण्यापूर्वी कॉफी, चहा किंवा गोड पदार्थांचे सेवन करू नका. 80 ते 20 अंश तापमान झोपेसाठी योग्य असं मानलं जातं त्यामुळे तुमची बेडरूम थंड ठेवा. रोज ठरलेल्याच वेळेला झोपा. आणि दिवसभर थोडी शारीरिक हालचाल करा जेणेकरून हलकासा व्यायाम होईल आणि गाढ झोप लागेल.












