Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • सावधान ! आरोग्यदायी म्हणून हळदीचे जास्त सेवन करत असाल तर त्वरित टाळा ही चूक; होऊ शकतो किडनी, लिव्हर संबंधित आजार
लाईफस्टाईल

सावधान ! आरोग्यदायी म्हणून हळदीचे जास्त सेवन करत असाल तर त्वरित टाळा ही चूक; होऊ शकतो किडनी, लिव्हर संबंधित आजार

A bowl of turmeric powder with fresh turmeric roots placed beside it, highlighting the risks of excess turmeric consumption for kidney and liver health

excess turmeric side effects : भारतीय स्वयंपाकघरात आणि आयुर्वेदात उपचारासाठी महत्वपूर्ण मसाला म्हणून हळद ओळखली जाते. आपल्या प्रत्येकाच्या घरातील औषधी मसाला म्हणून हळदी ओळखली जाते. हळद सौंदर्यवर्धक आणि रोगप्रतिकारक आहे. आपण हळद गुणकारी असल्यामुळे जास्त प्रमाणात सेवन करतो. परंतु सावधान ! तुम्ही हळदीचे जास्त सेवन करत असाल तर तुम्हाला महागात पडू शकते. जर जास्त प्रमाणात हळद आपल्या पोटात गेली तर आपल्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम दिसू शकतो. त्याचा किडनी आणि लिव्हर वर देखील दुष्परिणाम होऊ शकतो. याबाबत आता WHO ने नवीन रिसर्च नुसार माहिती सादर केली आहे. जाणून घेऊया काय आहे हा रिपोर्ट :

नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडिसिनच्या रिसर्च यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, हळदी मध्ये ऑक्सलेट चे प्रमाण जास्त असल्याने ते लघवीतील ऑक्सलेट वाढवते. आणि याचा परिणाम किडनी वर दिसून येतो. यामुळे किडनी स्टोन होण्याचे चान्सेस वाढता. त्यामुळे हळदीचे जास्त सेवन करणे घटक ठरू कते. हळद लिव्हरची सूज कमी करण्यासाठी फायदेमंद आहे. परंतु मागील वर्षी म्हणजे 2024 या वर्षी अनेकांनी हळदीचे जास्त सेवन केले. त्यामुळे इंटेन्स ड्रग – इंड्यूस्ड लिव्हर इंज्युरी, लिव्हर फेल आणि कधी-कधी हेपाटो-रेनल सिंड्रोमपाहायला मिळाले.

हे ही वाचा : या पदार्थांचे सेवन केल्यास, १०० टक्के रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येणार

किती प्रमाणात कराल हळदीचे सेवन

जर एखाद्या व्यक्तीचे वजन 60 ते 70 किलो असेल तर त्याने 200 mg प्रतिदिन हून अधिक कर्क्युमिन किंवा हळदीचे सेवन करू नये. किमान 2–2.5 g हळदीतून केवळ 60–100 mg कर्क्यूमिन मिळते.त्यानुसारच हळदीचे सेवन करावे अन्यथा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येऊ शकतो. तसेच तुम्ही जेवण बनवताना 1 ऐवजी अर्धा चमचा हळदी वापरू शकतात. परंतु त्या पेक्षा जास्त वापरणे गंभीर ठरू शकते.

कोणी हळदीचे सेवन टाळावे

ज्या व्यक्तींना किडनीच्या संबंधित आजार, किडनी स्टोन, लिव्हर संबंधित आजार असतील त्यांनी हळदीचे सेवन करू नये. याशिवाय रक्त पातळ करणारी, इम्यूनसप्रेसेंट, टॅक्रोलिमस या औषधांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींनी देखील हळदीचे सेवन टाळावे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts