Home remedies for dry cough : सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसात ईम्युनिटी पावर कमी असल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. सध्या वातावरणात बरेच बदल होताना दिसत आहे. कधी जास्त थंडी तर कधी दमट वातावरण तर कधी ऊन यामुळे हवामान बदलामुळे शरीरावर परिणाम दिसून येतो. तर बऱ्याचदा ईम्युनिटी खराब झाल्याने देखील आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. याचा आरोग्यावर परिणाम दिसून येतो. सर्दी खोकला, घशात खवखव होणे, कोरडा खोकला होणे यासारखे समस्या उद्भवतात. बऱ्याचदा दिवसा खोकल्याचा एवढा त्रास होत नाही जेवढा रात्री होतो. हिवाळ्यात कोरडा खोकला त्रासदायक बनतो.
हिवाळ्यात कोरड्या खोकल्याचे प्रमाण वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. कोरडा खोकला म्हणजे शरीरात सुकलेला कफ हा सहजरीत्या बाहेर पडत नाही. अशावेळी घशात सतत कोरडेपणा जाणवतो. आणि घशात काहीतरी टोचत असल्याचे जाणवते. वातावरणात होणारे बदल, प्रदूषण यामुळे होणारा संसर्ग हे कोरडा खोकला वारंवार होण्याचे कारणे असू शकतात. धुम्रपानाची सवय असलेल्यांना हिवाळ्यात जास्त त्रास होतो. आणि व्हायरल इन्फेक्शन असलेल्या व्यक्तीना देखील त्रास होतो.
करा हे उपाय
या कोरड्या खोकल्यावर घरगुती उपयांच्या मध्यमातून मात करता येऊ शकते. घरगुती प्रभावी उपाय गुणकारी असल्याचे आपण सर्वच जण मान्य करतो, यावर उपाय करण्यापूर्वी हिवाळ्यात आपल्या शरीराची पातळी योग्य असणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून घशातील कोरडेपणा कमी होईल. पाणी पातळी योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी तुम्ही हर्बल टी, सूप किंवा कोमट पाण्याचे सेवन करू शकतात.
मध आणि लिंबूचे मिश्रण
यासोबतच मध आणि लिंबू चे मिश्रण कोरडा खोकला दूर करण्यासाठी प्रभावी साधन आहे. कारण मधामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्समुळे घशाला आराम मिळतो, आणि लिंबातील व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यानुसार तुम्ही एक चमचा मधात दोन चमचे लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन करा. म्हणजे तुम्हाला त्वरित आराम मिळेल. आदरकमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात.
हे ही वाचा : अभिनेता धर्मेंद्र स्टाइल आयकॉन; त्यांचे 5 स्टाईलीश लुक
आले आणि मधाचे चाटण
याशिवाय तुम्ही आदरक आणि मधचे मिश्रण करून त्याचे चाटण तयार करू शकतात. त्यासाठी 20 ते 30 ग्राम किसलेले आदरक घ्या. ते कोमट पाण्यात किंवा मधात मिसळा. किंवा तुम्ही आल्याच्या चहाचे देखील सेवन करू शकतात.
डाळींबाचे साल
खोकल्यावर प्रभावी औषध म्हणून डाळींबाचे साल उपयोगी आहे. हे कोरड्या खोकल्यावर प्रभावी औषध आहे. डाळिंबाची साल कोमट पाण्यात भिजवून ठेवा. आणि त्या पाण्याचे सेवन करा. यामुळे घशाला शेक मिळेल. आणि खोकला देखील कमी होण्याची शक्यता आहे.












