Women’s Day 2026 | आजकाल बऱ्याच महिलांना घरातील कामातून, नोकरीला जाण्याच्या झावपळीतून स्वत:ला वेळ देणं होत नाही. घरातील जाबाबदाऱ्या, मुलांचा अभ्यास, नोकरी, शिक्षण अशा अनेक गोष्टींमध्य स्त्रिया गुंतूत जातात आणि त्यांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळही राहत नाही. त्यामुळे ऐन तारूण्यात बऱ्याच स्त्रियांना गुडघेदुखी, सांधेदुखी दम लागणे, वजन वाढणे अशा अनेक समस्या निर्माण होताना दिसतात. त्यामुळे स्त्रिया टेन्शनमध्ये येतात. पण जर स्वत:ला फिट आणि निरोगी ठेवायचं असेल तर व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वत:साठी थोडासा वेळ काढून व्यायाम (Exercise) करणं गरजेचं आहे. चला तर मग आता आपण घरच्या घरी करता येतील असे काही प्रभावी व्यायाम कोणते याबाबत जाणून घेणार आहोत, ज्यामुळे स्त्रियांना फीट आणि हेल्थी राहण्यास मदत होईल.
हेही वाचा – Women’s Day निमित्त तुमच्या आयुष्यातील ‘ती’ला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके शुभेच्छा
स्त्रियांनी दररोज करायला हवेत असे प्रभावी व्यायाम
1. प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपलं शरीर स्लीम आणि लवचिक राहाव. तर तुम्हालाही तुमचं शरीर फीट आणि लवचिक ठेवायचं असेल तर दररोज नियमितपणे स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. जेव्हाही तुम्ही खूप गडबडीत असाल, कामात असाल किंवा तुम्हाला व्यायाम करायला जमणार नसेल त्यादिवशी तुम्ही स्ट्रेचिंग आणि त्याचे वेगवेगळे प्रकार करू शकता. याने तुमचे शरीर लवचिक राहण्यास मदत होते.
2. बऱ्याच महिलांना हाडांच्या दुखण्याचा त्रास होत असतो. मग हातामधील हाडे असतील किंवा पायातील अनेक महिलांना हा त्रास होत असतो. तर त्रास कमी करायचा असेल वेटलिफ्टिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग असे व्यायाम करायला हवे. यामुळे हाडांची ताकद वाढण्याच मदत होते आणि हाडे मजबूत होतात.
3. अनेक महिलांची चिडचिड खूप होत असते. दररोजचा कामाचा स्ट्रेस, मूड स्वींग्स, वाढत्या जबाबदाऱ्या अशा अनेक गोष्टींमुळे महिलांवर खूप मानसिक ताण येताना दिसतो. मानसिक ताण वाढला कि शरीरातील हार्मोन्सचे संतुलन देखील बिघडते. त्यामुळे ज्या महिलांना खूप मानसिक ताण येतो अशा महिलांनी दररोज मेडिटेशन, ध्यानधारणा करणे खूप गरजेचे आहे. यामुळे तुमचे मन शांत आणि फ्रेश राहण्यास मदत होते आणि तणाव कमी होतो.
4. वयाच्या तिशीनंतर अनेक महिलांमध्ये स्नायूशी संबंधित त्रास होण्यास सुरूवात होते. तर स्नायूशी संबंधित दुखणी कमी करायची असतील तर महिलांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्नायूंची ताकद वाढायला मदत होते आणि अंगदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
5. लठ्ठपणा ही अशी समस्या आहे जी आजकाल बऱ्याच महिलांना सतावाताना दिसते. फास्ट फूड खाणं, व्यायाम न करणं, पीसीओडी अशा अनेक कारणांमुळे महिलांचे वजन वाढण्यास सुरूवात होते. तर तुम्हाला जर तुमचे वजन कमी करायचे असेल आणि नियंत्रणात ठेवायचे असेल तर कार्डिओ एक्सरसाईज करा यामुळे तुमचे वजय नियंत्रणात राहण्यास मदत होईल.












