• Home
  • लाईफस्टाईल
  • महिला दिनानिमित्त आई, बहिण, मैत्रिणीसोबत फिरायचंय? मग कर्नाटकातील ‘या’ खास ठिकाणांना भेट द्या!
ताज्या बातम्या

महिला दिनानिमित्त आई, बहिण, मैत्रिणीसोबत फिरायचंय? मग कर्नाटकातील ‘या’ खास ठिकाणांना भेट द्या!

International Womens Day

International Women’s Day 2026 : आजच्या काळात फिरणे, नवीन ठिकाणे पाहणे आणि वेगवेगळ्या संस्कृतींचा अनुभव घेणे हे अनेकांच्या आवडीचे असते. विशेषतः महिला मंडळींमध्ये प्रवासाची आवड दिवसेंदिवस वाढताना दिसते. काहींना आई, बहिण, मैत्रिणीसोबत ग्रुपमध्ये फिरायला जाणे आवडते, तर अनेक महिला एकटे भटकंतीचा अनुभव घेण्यास उत्सुक असतात.

मात्र, सुरक्षिततेचे प्रश्न, कुटुंबीयांची काळजी किंवा काही सामाजिक मर्यादा यांमुळे अनेकदा महिलांना एकट्याने प्रवास करण्याची संधी मिळत नाही. विशेषतः अनोळखी ठिकाणी जाणे किंवा उशिरापर्यंत बाहेर राहणे याबाबत अनेक महिलांना संकोच वाटतो. त्यामुळे प्रवासाची इच्छा असूनही अनेक जणी ती पुढे ढकलतात.

हेही वाचा – उन्हाळ्यात केस होतात ड्राय अन् चिकट; ‘या’ सोप्या टिप्स ठरतील रामबाण

सुरक्षितता, सोयीसुविधा आणि पर्यटकांसाठी अनुकूल वातावरण

पण आता काळ बदलत आहे आणि महिलाही अधिक आत्मविश्वासाने जगभर प्रवास करू लागल्या आहेत. सुरक्षितता, सोयीसुविधा आणि पर्यटकांसाठी अनुकूल वातावरण असलेली अनेक भारतातील ठिकाणे आज महिलांसाठी उत्तम पर्याय ठरत आहेत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने, जर तुम्ही आई, बहिण, मैत्रिणीसोबत ग्रुपमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर हंपी हे बेस्ट आहे. चला तर मग, जाणून घेऊया याबाबत अधिक सविस्तर माहिती…

हंपी अजूनही त्याच्या अवशेषांद्वारे त्याच्या भव्यतेची साक्ष

कर्नाटकातील हंपी हे ठिकाण आपल्या ऐतिहासिक वारशासाठी, प्राचीन मंदिरांसाठी आणि अद्भुत वास्तुकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. एकेकाळी भव्य आणि समृद्ध विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेली हंपी अजूनही त्याच्या अवशेषांद्वारे त्याच्या भव्यतेची साक्ष देते

हंपीमध्ये पाहण्यासारखी अनेक आकर्षक ठिकाणे आहेत. त्यापैकी, एक प्राचीन मंदिर, विरुपाक्ष मंदिर हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. तसेच, प्रसिद्ध दगडी रथ आणि विठ्ठल मंदिरातील अद्भुत कारागिरी पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होतात. दगडीच्या विशाल टेकड्या, तुंगभद्रा नदीचे सुंदर दृश्य आणि शांत वातावरण हंपी प्रवासाला अधिक खास बनवते.

इतिहास, निसर्ग आणि वास्तुकलेचा अनोखा संगम हा एक अद्भुत अनुभव आहे आणि महिला दिनानिमित्त तुमच्या बहिणीला किंवा मैत्रिणीला हंपीला भेट देणे निश्चितच एक संस्मरणीय अनुभव असू शकतो.

हंपीला कसे जावे?

हंपीला डायरेक्ट रेल्वे स्टेशन नाही. त्यामुळे जवळचे स्टेशन म्हणजे होस्पेट जंक्शन (अटाचे नाव होसापेते) आहे.
पुणे, मुंबई, बेंगळुरूहून येथे रेल्वे उपलब्ध आहेत.
स्टेशनपासून हंपी सुमारे १२- १४ किमी अंतरावर आहे.
तुम्ही टॅक्सी, ऑटो किंवा बसने हंपीला जाऊ शकता

रोड ट्रिप

जर तुमच्याकडे कार किंवा बाईक असल्यास तुम्ही रोड ट्रिप करू शकता.

पुणे ते हंपी: अंदाजे ४४० किमी (९-१० तास)

बेंगळुरू ते हंपी: अंदाजे ३४० किमी

रस्त्यावर सुंदर पर्वत आणि ग्रामीण भाग दिसतात, त्यामुळे रोड ट्रिपचा अनुभव अनोखा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts