Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • या 5 वस्तु घरात ठेवल्यास संपूर्ण घरावर होईल माता लक्ष्मीची कृपा
Top News

या 5 वस्तु घरात ठेवल्यास संपूर्ण घरावर होईल माता लक्ष्मीची कृपा

Items for Mata  Lakshmi blessings :  हिंदू धर्मात माता लक्ष्मीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मत लक्ष्मीला सुख समृद्धी, धन संपत्ति देणारी देवी मानले जाते. जेव्हा माता लक्ष्मी नाराज असते तेव्हा घरात पैशांची आर्थिक गरज जाणवते. म्हणून बरेच व्यक्ति माता लक्ष्मीला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. तसेच माता लक्ष्मीचा वास घरात दरवळावा यासाठी धन संपत्ति वाढवणाऱ्या वस्तु घरात ठेवण्यास प्राधान्य देतात. जाणून घेऊया कोणत्या आहेत या वस्तु

कुबेर मूर्ती

संपत्तीची देवता म्हणून भगवान कुबेर यांना मानले जाते. तसेच वास्तुशास्त्रानुसार कुबेराची मूर्ती घरात ठेवणे लाभदायक मानले जाते. यामुळे घरात पैशांची कमतरता भासत नाही. एवढेच नाही तर माता लक्ष्मीचे निवासस्थान देखील घरात असते. कुबेराची मूर्ती घरात ठेवल्यामुळे कुटुंबामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
यामुळे मन शांत आणि प्रसन्न राहते.

नारळ

वास्तुशास्त्रानुसार घरात नारळ ठेवणे अत्यंत लाभदायक मानले जाते. कारण घरात नारळ ठेवल्याने घरात पैसे येण्याचा मार्ग मोकळे होतात. घरात नारळ ठेवल्यास घराची तिजोरी कधीच रिकामी होत नाही. म्हणूनच घरात नारळ ठेवण्याचा सल्ला ज्योतिष देत असतात.

चांदीची बासरी

वास्तुशास्त्रानुसार घरात चांदीची बासरी ठेवल्यास नाकारात्मकता राहत नाही. ज्या घरात चांदीची बासरी ठेवली जाते त्या घरात नकारात्मक ऊर्जा नस्थ होऊन सकारात्मक ऊर्जा वास करते. एवढेच नाही तर ज्या घरात बासरी असते, त्या घरात श्रीकृष्ण विराजमान होतात. तर संपत्ति ऐश्वर्याची कमी देखील या घरात भासत नाही.

हे ही वाचा : घरातील धनसंपत्ती वाढवण्यासाठी ‘या’ दिशेला लावा केळीचे झाड

शंख

माता लक्ष्मीचे प्रतीक असलेले शंख घरात ठेवणे फायदेशीर मानले जाते. कारण यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद घरात कायम वास करतो. यामुळे संपत्तिमध्ये देखील वाढ होते.

तुळस

तुळस ही पवित्र महणली जाते. तुळस ही आरोग्य आणि दिव्यतेचे प्रतीक आहे. तुम्ही घरातील अंगणात तुळस लावली असेल तर घरातील वातावरण शुद्ध राहते.

याशिवाय तुम्ही घराच्या प्रवेशद्वारावर शुभचिन्ह काढून दरवाजावर सुंदर तोरण लावू शकतात.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts