Most poisonous fish : जगातील सर्वात विषारी मासा म्हणून ‘स्टोनफिश’ माशाची ओळख आहे. त्याला स्पर्श होताचं माणसाचा मृत्यू होतो. स्टोनफिश हा हिंदी महासागराच्या उथळ, खडकाळ भागात आढळणारा मासा आहे. दगड आणि स्टोनफिस मासा ओळखणे खुप कठीण आहे. त्यामुळे अनेक लोक या माशाचे बळी ठरत आहेत. लोक चुकून दगड समजून त्यावर पाऊल ठेवतात, आणि आपला जीव गमवतात. ४५ सेंटीमीटर लांबीपर्यंत वाढणारा हा मासा विषारी म्हणून सूचीबद्ध आहे. तो अन्न म्हणून जिवंत मासे पसंत करतो.
जगातील सर्वात विषारी मानला जाणारा हा स्टोनफिश नागरीकांना ओळखू यावा आणि त्यांनी जीवन गमावू नये म्हणून उत्तर प्रदेशातील लखनऊ प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आला आहे. हा मासा कन्याकुमारी येथून आयात करण्यात आला आहे. मरीन अॅक्वेरियममध्ये पर्यटकांना इतर जलचर आणि माशांसह स्टोनफिश पाहता येईल. हा दगडासारखा दिसणारा मासा अत्यंत विषारी आहे.
हे ही वाचा : या देशात उगवत नाही सहा महिने सूर्य, याच ठिकाणी संपते जग
स्टोनफिश अत्यंत विषारी
स्टोनफिश हा एक मासा आहे ज्याने त्याच्या पाठीचा कणा काट्यासारख्या रचनेत विकसित केला आहे. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या संशोधनातून असे दिसून आले की ते शत्रू मासे आणि मानवांमध्ये विष टोचण्यासाठी त्याच्या मणक्याचा वापर संरक्षणात्मक करते. त्याचे विष सापासारखेच प्राणघातक आहे आणि अँटीवेनमशिवाय जगणे कठीण आहे.
ते डोळ्याच्या झटक्यात मारू शकते.
दगडी मासा संपर्कात आल्यानंतर ०.५ सेकंदात त्याचे विष सोडतो. ज्यामुळे काही सेकंदातच माणसाचा मृत्यू होऊ शकतो. अगदी डोळ्यांच्या झटक्यात माणसाचा मृत्यू होऊ शकतो. असे म्हटले जाते की, या माशाच्या विषाचा एक थेंबही शहरातील पाण्यात मिसळला तर शहरातील प्रत्येक व्यक्तीचा जीव जाऊ शकतो.










