sun does not rise for six months : जगाचा सर्वात शेवटचा टोक किंवा जगाचा शेवट कुठे होतो? जग कुठे संपते, असा कोणता भाग आहे जिथे जग थांबते. हे प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल. यानुसारच जगातील रस्ते कुठे संपतात. या जगातील सर्वात शेवटचा रस्ता कोणता असेल याचे उत्तर आज आपण पाहणार आहे.
आपल्याला पडलेल्या प्रश्नानुसार असं म्हटलं जातं की, जगातील सर्वात शेवटच्या रस्त्यावर जग संपते. पृथ्वीच्या उत्तर ध्रुव्यात North pole Mystery सर्वात लांबचा बिंदू आहे. याच ठिकाणावरून पृथ्वीचा अक्ष फिरतो.
या ठिकाणी नॉर्वे हा देश आहे. या नॉर्वे देशात जगातील सर्वांत शेवटचा रस्ता असल्याचं मानल्या जातं. कारण या रस्त्याच्या पुढे कोणताच रस्ता नसून फक्त समुद्र आणि बर्फ आहे.
या रस्त्याचं नाव E69 असून जगाच्या शेवटच्या टोकावर हा रस्ता आहे. या रस्त्याची लांबी सुमारे 14 किलोमीटर आहे. हा एक महामार्ग असून या मार्गावर एकटे जाणे किंवा एकटे वाहन चालवणे अनिवार्य आहे. या रस्त्यावर
तुम्हाला बरेच किलोमीटर पर्यंत बर्फाची दाट सादर असल्याचे दिसून येईल. या ठिकाणी वाहून जाण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे या रस्त्यावर जाण्यासाठी बऱ्याच लोकांना सोबत घेऊन जावे लागते.
E69 या रस्त्यावर पावसाळ्यात सूर्य उगवत नाही. त्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यात संपूर्ण अंधार दिसतो. बऱ्याचदा सहा महिन्यांपर्यंत सूर्य उगवत नाही. पावसाळ्यामध्ये या ठिकाणचे वातावरण मायनस 43 डिग्री (-43)पर्यंत असते.
आणि उन्हाळ्यात हे तापमान झिरो डिग्री सेल्सिअस असते. तरीसुद्धा लोक या ठिकाणी राहतात.
हे ही वाचा : चालत्या गाडीत ब्रेक फेल झाल्यास करा या टिप्स फॉलो; जेणेकरून अपघात होण्यापासून वाचू शकेल
1930 नंतर हे ठिकाण डेव्हलप झाले आहे. 1934 मध्ये या ठिकाणी पर्यटना साठी येणाऱ्या लोकांचे स्वागत करण्यात येऊ लागले. आणि या ठिकाणी राहण्यासाठी आलेल्या लोकांचा व्यवसाय पर्यटकांवर अवलंबून झाला.
आता या ठिकाणी सर्व प्रकारची रेस्टॉरंट हॉटेल्स उपलब्ध असून जगभरातून लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. या ठिकाणी मावळतीचा सूर्य आणि पोलर लाईट्स पाहण्यासाठी वेगळाच आनंद होतो.






