• Home
  • बिजनेस
  • गृहकर्ज वाहनकर्ज धारकांना मिळणार दिलासा; ईएमआय कमी होण्याची शक्यता
Top News

गृहकर्ज वाहनकर्ज धारकांना मिळणार दिलासा; ईएमआय कमी होण्याची शक्यता

RBI Governor Sanjay Malhotra standing, with the Reserve Bank of India logo visible on the other side.

EMI relief for home and vehicle loans : जर तुम्ही ईएमआय भारत असाल किंवा तुम्ही होम लोन किंवा कार लोन घेतलेले असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता गृहकर्जावरील हप्ता कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत आरबीआय चे गावरणार संजय मल्होत्रा यांनी मोठे संकेत दिले आहेत. म्हणजेच आता सर्वसाधारण नगरिकान दिलासा मिळण्याची शक्यता असून आता तुमचं ईएमआय कमी होऊ शकतो.

आरबीआय म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पॉलिसी रेट कट होण्याची शक्यता वर्तवली आहे. म्हणजेच आता रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. ही कर्जदारांसाठी ही मोठी आणि आनंददायी बातमी आहे. कारण रेपो रेट कमी झाल्यास वाहन आणि गृहकर्जाचा हप्ता देखील कमी होऊ शकतो. एवढेच नाही तर व्याजदरात मोठी कपात होणार असल्याने ईएमआय कमी होऊन कर्जदारांना दिलासा मिळेल.

सध्या काही अर्थशास्त्राणच्या म्हणण्यानुसार रुपयाची ऐतिहासिक घसरण सुरू आहे. पुढच्या महिन्यापर्यंत डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात निच्चांकीस्तरावर रुपया जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरीही आरबीआय चे गव्हर्नर संजय मल्होत्रा हमखास ईएमआय कमी होण्याचे स्वप्न दाखवत आहे. ते म्हणतात की, फक्त कर्जदारच नाही तर रिअल इस्टेट आणि संबंधित सर्वच क्षेत्रांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा : तेजीसह उघडला देशांतर्गत शेअर बाजार; सेन्सेक्सनं घेतली 195 अंकांची उसळी; निफ्टीनं ओलांडला 26,100 चा टप्पा

गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसादही उमटताना दिसत आहे. सध्या भारताच्या 10-वर्षीय बेंचमार्क बाँड यील्डमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. संजय मल्होत्रा यांनी सध्या रुपयाची घसरण ही स्वाभाविक असल्याचे सांगितले आहे. त्यांच्यामते चलनातील अस्थिरता कमी करण्यासाठी आरबीआयने यापूर्वी हस्तक्षेप केल्याचे देखील त्यांचे म्हणणे आहे. तज्ञांच्यामते रुपयात वार्षिक 3-3.5 टक्क्यांची घसरण ऐतिहासिक सरासरीशी मिळतीजुळती असून डिसेंबर महिन्यात अजून व्याजदर कमी झाल्यास ग्राहकांचा मोठा ताण मिटेल. त्यामुळे बाजारात पैसा खेळता राहण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर बचतीचा आकडा सुद्धा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts