Brake Failure Safety Tips : नुकताच पुण्यातील, नवले ब्रिज पुलावर भीषण अपघात घडला. या अपघातात निष्पाप जीवांना त्यांचा जीव गमवावा लागला. हा प्रकार घडला ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे. आपण बऱ्याचदा अशावेळी घाबरून जातो. आणि घाबरल्यामुळे आपल्याला काय करावं हे समजत नाही. आणि नकळत भीषण दुर्घटनेला आपल्याला सामोरे जावे लागते. याशिवाय रस्त्यावर वाहनांच्या वाढत्या संख्येवरून आपण अंदाज लावू शकतो की, कार चालवणे किंवा ट्रॅव्हल्स करणे लोकांना किती आवडत असेल. पण कार चालवताना सावधानी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून अपघात होण्यापासून वाचू शकेल. जाणून घेऊया कर चालवताना ब्रेक फेल झाल्यास आपण काय करायला हवे, जेणेकरून भीषण अपघात टाळता येईल.
गाडीची स्पीड कमी करत ब्रेक लावण्याचा प्रयत्न करा
कार चालवताना किंवा कार शिकत असताना आपल्याला सतत ब्रेक कडे लक्ष द्या असं सांगितलं जातं. कारण बऱ्याचदा अर्जंट ब्रेक दाबणे ब्रेकवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. चालू गाडी तुमच्या कारचे ब्रेक फेल झाल्यास घाबरून जाऊ नका. अशावेळी तुम्हाला शांत राहून निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्या गाडीची स्पीड कमी करत ब्रेक लावण्याचा प्रयत्न करा. आणि कार पहिला गिअरवर आणा. यावेळी कंटिन्यू ब्रेक लावत रहा. जेणेकरून ब्रेक पुन्हा काम करण्याची शक्यता असते.
हैजार्ड लाईट चालू करा
कारचे ब्रेक फेल झाल्यावर हैजार्ड लाईट अर्जंट चालू करा. जेणेकरून आपल्या मागील कार चालकाला कार खराब झाल्याचे किंवा काहीतरी धोका असल्यास कळेल. त्याचबरोबर तुम्ही यावेळी कारचा हॉर्न देखील कंटिन्यू वाजवू शकतात.
तुम्ही हे सुद्धा पाहु शकता :
स्पीड कमी करून गियर बदला
कारचे ब्रेक फेल झाल्यावर घाबरून न जाता विचार करून निर्णय घ्या. कार स्पीड मध्ये असेल तर हळूहळू स्पीड कमी करून गेअर चेंज करा. परंतु रिवर्स गेअर चा उपयोग करू नका. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त वाढते. त्याचबरोबर कारमधील एसी फुल करा. जेणेकरून जिंवर दबाव पडेल आणि कार ची स्पीड कमी होईल.
हॅन्ड ब्रेक वापरा (Brake Failure Safety Tips)
कारचे ब्रेक लागत नसतील तर स्पीड कमी करणे, ब्रेक लावत राहणे, कार पहिल्या गिअर वर आणणे, हे सर्व पर्याय करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी हॅन्ड ब्रेक लावणे गरजेचे आहे. फुल स्पीड मध्ये हॅन्ड ब्रेक लावल्यास दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमची कार कंट्रोल मध्ये आहे, तुमच्या कारची स्पीड कमी झालेली आहे. तेव्हाच हॅन्ड ब्रेक लावल्याने तुमची कार थांबेल.






