Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • हिवाळ्यात केसांसाठी उपयुक्त ठरेल मोहरीचे तेल; यात मिक्स करा ही गोष्ट, होईल डबल फायदा
लाईफस्टाईल

हिवाळ्यात केसांसाठी उपयुक्त ठरेल मोहरीचे तेल; यात मिक्स करा ही गोष्ट, होईल डबल फायदा

Mustard oil bottle partially hidden inside long hair

Mustard oil benefits for hair in winter : हिवाळ्यात आपल्याला अनेक समस्यांवर मात करावी लागते. जसे कि, कोरडी त्वचा, कोरडे केस, टाळूवरील काही अडचणी, केसांमध्ये हिवाळ्यात वाढलेला कोंडा, केस गळती यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून बाजारपेठेत विविध तेल आणि सिरम्स उपलब्ध आहे. परंतु अद्यापही आयुर्वेदिक घरगुती उपायांना प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यापैकी एक म्हणजे मोहरीचे तेल. या मोहरीच्या तेलाला आयुर्वेदात काळं सोनं म्हंटले जाते.

भारतीय स्वयंपाक घरात मोहरीचे तेल असतेच. परंतु पूर्वीच्या काली हे तेल फक्त स्वयंपाकपुरताच मर्यादित नव्हतं. तर ते शरीर आणि केसांच्या सौन्दर्याचे प्रतीक मानले जात होते. आजकालच्या आधुनिक युगात केस गळती, कोरडेपणा आणि केस  अकाली पांढरे होणे या समस्यांवर उपाय योजना करण्यात येतात, या समस्या पूर्वीच्या काळात कमी जाणवत असे. कारण त्याकाळी मोहरीचे तेल केसांसाठी वापरण्यात येत होते. आजच्या आधुनिक युगात देखील या तेलाचा वापर आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

का आहे फायदेशीर

आयुर्वेदानुसार मोहरीचे तेल हे उबदार गुणधर्म असलेले म्हणजेच उष्णवीर्य आणि कफ-वात शामक आहे. आपल्याला केस गळती,  टाळूवर कोरडेपणा येणे, केसांमध्ये कोंडा होणे यासारख्या समस्या का होतात ? तर या समस्या वात आणि कफ या दोषांच्या असंतुलनामुळे होतात. आणि या समस्यांवर मोहरीचे तेल हे टाळूला पोषण देण्यासाठी फायदेशीर ठरते. तेलं स्निग्धं, वायू नाशनं, बल्यं च | या स्रोतांनुसार तेल हे शरीराला आणि केसांना बळ देणारे, वातदोष कमी करणारे चमत्कारिक औषध आहे. मोहरीच्या तेलात आपण जर ही एक खास वस्तू मिसळली तर केस गळती, टक्कल पडणे यासारख्या समस्या कमी होऊन केस घनदाट बनवण्यास आणि मजबूत करण्यास फायदा होऊ शकतो.

मोहरीच्या तेलात असतात हे घटक

मोहरीच्या तेलामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सीडेन्ट, व्हिटॅमिन E , सेलेनियम, झिंक आणि ओमेगा 3, फॅटी एसिड्स असतात. ज्यामुळे केसांना मुळांपासून पोषण मिळते, रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते, केस गळतीवर नियंत्रण मिळते. टाळूतील सूक्ष्म जंतू नष्ट होऊन केसांना निरोगी ठेवण्यास फायदा होतो. आयुर्वेदानुसार मोहरीच्या तेलात कढीपत्ता, मेथीचे दाणे हे मिसळल्यास  चमत्कारिक फायदा बघायला मिळतो.

हे ही वाचा – सावधान ! तुम्हीही हिवाळ्यात कानटोपी घालून झोपतात का ? जाणून घ्या आरोग्यासाठी आहे फायदेशीर कि नुकसानदायक

या पद्धतीने तयार करा हे मिश्रण

एका पातेल्यात अर्धा कप मोहरीचे तेल घ्या. हे तेल मंद आचेवर गरम होऊ द्या. त्यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पाने आणि 1 टेबल स्पून मेथी दाणे टाका. त्यानंतर 7 ते 8 मिनिटं हे मिश्रण गरम होऊ द्या. त्यानंतर हि पाने काळपट पडल्यानंतर गॅस बंद करा. आणि हे तेल थंड झाल्यानंतर गाळून काचेच्या बाटलीत साठवून ठेवा. आणि हे तेल आठवड्यातून दोन ते तीन वेळेस केसांना लावा. आणि त्यानंतर टाळूला हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर हे तेल केसांवर ठेऊन 1 तासानंतर सौम्य हर्बल शाम्पूने धुवून काढा.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

हळदाची पाने : आयुर्वेदिक गुणांचा अनमोल खजिना हल्लीम (Garden Cress Seeds): आरोग्यासाठी नैसर्गिक सुपरफूड स्ट्रॉबेरी: गोड लाल आरोग्यदायी फळ सुंठ (Dry Ginger): आरोग्याचा खजिना साजूक तूप: आरोग्याचं अमृत, रोजच्या आहारातली सुवर्णकिल्ली!