Slow Living concept : आजकाल आपली जीवन लिमिटेड झाले आहे. घर, ऑफिस आणि मोबाईल. याच गोष्टींच्या मागे आपण बिझी आहे. कारण धावपळीची जीवनशैली. या जीवनशैलीमुळे आपण आजूबाजूला काय सुरु आहे हेच विसरून जातो. सकाळची धावपळ, मोबाईलमध्ये सुरु असलेले काम किंवा इन्स्टा स्क्रोलिंग, आणि कामाचा ताण या सर्वांभोवती फिरताना आपल्याला वेळेचे भान राहत नाही. आणि आपण सतत एकच वाक्य म्हणतो– ‘माझ्याकडे वेळच नाही.’ आजचं आपलं आधुनिक आयुष्य हे याच चौकटीत अडकलंय.
सक्सेस, पैसा आणि वेळ या शर्यतीत आपण पुढे गेलो, हे खरंय. पण आपलं मन मात्र मागेच राहिलंय. म्हणूनच 2026 या वर्षात मागे वळून सरत्या वर्षाकडे पाहताना असा प्रश्न पडतो कि, खरंच आपले आयुष्य आपण आनंदाने जगत आहे की जगायचं म्हणून जगतोय. याच प्रश्नाचे उत्तर शोधात असताना अनेक जण slow Living ही संकल्पना आपल्या आयुष्यात आजमावत आहे. कमी आवाज, गोंगाट कमी ताण तणाव आणि जाणीवपूर्वक जगण्याची जीवनशैली हे फक्त आता ट्रेंडमध्ये नसून मानसिक आरोग्य आणि शांततेचे प्रतीक ठरत आहे.
हे ही वाचा : अंगारकी चतुर्थीसाठी बनवा हे उपवासाचे पदार्थ; बाप्पा होतील प्रसन्न
काय आहे slow living संकल्पना
Slow Living म्हणजे आळशीपणा नाही तर जाणीवपूर्वक, शांत आणि संतुलित आयुष्य जगणे. प्रत्येक गोष्ट करताना घाई न करता, स्वतःच्या गरजा भावना सांभाळून करणे, आपल्या आरोग्याला आणि भावनांना प्राधान्य देणे, शांत आयुष्य जगणे म्हणजे Slow Living. slow living या कन्सेप्टनुसार आयुष्य जगत असताना आपण आपल्या कम्फर्टनुसार आयुष्य जगू शकतो. आपल्या गरजा देखील पूर्ण करू शकतो.
भारतात कोरोना महामारीचे संकट आल्यापासून लोकांनी आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. या कोरोना महामारीच्या काळापासूनच काम हेच आयुष्य ही संकल्पना मागे पडली. आज अनेकांना मोठे घर, मोठी गाडी, आणि मोठे पद हे सर्व आपल्याकडे असून सुद्धा आपण समाधानी राहू शकत नाही. त्यामुळे असा सवाल उपस्थित होतो कि, आपण इतकं धावतोय तरी कुठे ? आपलं मन, आपली इच्छा आहे तरी कुठे ?
डिजिटल बर्नआऊट
आपण सध्या डिजिटलायझेशनच्या युगात आहे. स्मार्टफोन, सोशल मीडियावर सतत सक्रिय राहण्याची सवय यामुळे डिजिटल बर्नआऊट वाढत आहे. या स्लोव लिविंगच्या जगात मोबाईलचा वापर मर्यादित करणे, फोन फ्री विकेंड पाळणे यासारख्या सवयी देखील स्लो लिविंगचाच एक भाग आहे. पूर्वी आपल्याकडे फक्त वर्क फ्रॉम ऑफिस हाच एक ऑप्शन होता. परंतु आता वर्क फ्रॉम ऑफिस सह वर्क फ्रॉम होम, हायब्रीड जॉब आणि फ्रिलान्सिंग हे पर्याय आहे. कामासाठी जगण्यापेक्षा जगण्यासाठी काम करणे हि आजची स्लो लिविंगची डेफिनेशन आहे.












