Angarki Chaturthi fasting recipes : उद्या 2026 मधील पहिली अंगारकी चतुर्थी आहे. भगवान श्री गणेशाला समर्पित असलेली विशेष चतुर्थी म्हणजे अंगारकी. एखादी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्याला अंगारकी चतुर्थी म्हणतात. तुम्ही जर 2026 या नवीन वर्षात पहिल्यांदा किंवा नव्याने संकष्टी चतुर्थीला उपवास करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही मंगळवारी म्हणजे उद्या येणारी अंगारकी चतुर्थी धरून संकष्ट चतुर्थीच्या उपवासाला सुरुवात करू शकतात. हिंदू धर्मात मंगळवारी उपवास, पूजा–अर्चा, नैवेद्य आणि मंत्रजपाला खास महत्व आहे. तुमच्या मनात श्रद्धा असेल तर विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमची कोणतीही मनोकामना पूर्ण करतात.
अंगारकी चतुर्थीला उपवास करणे हे फक्त धार्मिक विधी नाही तर मनःशांतीसाठी लाभदायक आहे. आपण उपवास करताना जर उपवासात सात्विक आणि हलक्या अन्नाचे सेवन केल्यास तुमचे पचन सुधारण्यास मदत होते. तुम्ही देखील उद्या उपवास करणार असाल तर उपवासाला कोणते पदार्थ खावे असा प्रश्न तुम्हाला पडला असले. तर आजच्या लेखात आपण कोणते पदार्थ खावे आणि कशाचा नैवेद्य बाप्पाला दाखवावा हे पाहणार आहोत.
साबुदाणा खिचडी
उपवास असल्यावर आपल्या घरी हमखास बनणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी. हा उपवासात लोकप्रिय आणि पोटभरणारा पदार्थ आहे. साबुदाणा, उकडलेले बटाटे, भाजलेले शेंगदाण्याचे कूट, सैंधव मीठ या पदार्थांना मिक्स करून साबुदाणा खिचडी तयार केली जाते. परंतु या खिचडी साठी साबुदाणा व्यवस्थित भिजणे गरजेचे आहे. अन्यथा साबुदाणा खिचडी चिकट होऊ शकते.
हे ही वाचा : 1 जानेवारी प्रत्येकाचं नवीन वर्ष नाही! अर्ध जग आपलं नवीन वर्ष कधी आणि कसं साजरं करतात, ते जाणून घ्या
रताळ्याची भाजी
उपवासासाठी चालणारी फळभाजी म्हणजे रताळे. रताळे हे फळ उपवासासाठी खास मानले जाते. तुम्ही रताळ्याची तूप जिरे घालून केलेली भाजी उपवासासाठी बनवू शकतात. ही भाजी पोटाला हलकी आणि पौष्टीक असते. रताळ्याच्या असलेली नैसर्गिक साखरेमुळे अशक्तपणा जाणवत नाही. तुम्ही रताळ्याचा शिरा देखील बनवू शकतात.
शेंगदाण्याची उसळ आणि भगरीचा भात
तुम्ही उकळलेल्या शेंगदाण्याची उसळ देखील उपवासाला बनवू शकतात. हा उपवासासाठी उत्तम पर्याय आहे. तुम्ही या शेंगदाण्याच्या उसळ सोबत भगरीचा भात देखील तयार करू शकतात.
नारळ गुळाचे लाडू
बुद्धीची देवता गणपती बाप्पाला नारळ आणि गूळ अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पाला नारळ गुळाचे लाडू नैवेद्य म्हणून ठेऊ शकतात. हे लाडू तयार करण्यासाठी किसलेलं ओलं खोबरे घ्या. त्यामध्ये गूळ एकत्र करून टाका. त्यामध्ये थोडी वेलदोड्याची पूड टाका. आली हे सर्व मिश्रण गॅस वर गरम करून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे लाडू वळून घ्या. हे लाडू पचनासाठी हलके असतात.
केळीचे शिकरण
उपवासासाठी तुम्हाला गोड खाण्याची इच्छा असेल तर केळी दुधाचा शिरा बनवू शकतात. तुपामध्ये केळी परतुन घ्या. त्यामध्ये दूध आणि गूळ घाला. शिरा तयार. हा शिरा लहान मुलांना फार आवडतो. तुम्ही याशिवाय केळीचे शिकरन देखील बनवू शकतात.
फळांचे सेवन
अंगारकी चतुर्थीला अनेकजण फळांचे सेवन करतात. फळांचे सेवन करणे हे नेहमी फायदेशीर मानले जाते. तुम्ही उपवासासाठी सफरचंद, केली, डाळिंब, पपई यांचे छोटे छोटे काप करून त्यावर दही घालून त्याचे सेवन करू शकतात. ही फ्रुटप्लेट पचन सुधारण्यास प्रभावी आहे. याशिवाय शरीर हायड्रेट ठेवण्यास देखील फायदेशीर आहे.
अंगारकी चतुर्थीसाठी तुम्ही गणपती बाप्पाला मोदक, लाडू, नारळ आणि दुर्वा अर्पण करू शकतात. आणि नैवेद्य अर्पण करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ | निर्विघ्नं कुरु मी देव सर्वकार्येषु सर्वदा | या मंत्राचा उच्चार करावा.








