• Home
  • ताज्या बातम्या
  • Dussehra Special Thali : दसऱ्याच्या दिवशी देवीला अर्पण करा ‘ही’ शुभ नैवेद्य थाळी; पुरणपोळीपासून कटाच्या आमटीपर्यंत संपूर्ण मेनू!
फूड

Dussehra Special Thali : दसऱ्याच्या दिवशी देवीला अर्पण करा ‘ही’ शुभ नैवेद्य थाळी; पुरणपोळीपासून कटाच्या आमटीपर्यंत संपूर्ण मेनू!

Dussehra Special Thali
2
Dussehra Special Thali: दसरा म्हणजे विजय, आनंद आणि समृद्धीचा सण. यंदा २० ऑक्टोबर रोजी सर्वत्र विजयादशमी साजरी केली जाणार आहे. या शुभदिनी देवीला पारंपरिक आणि स्वादिष्ट नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. चला, जाणून घेऊया संपूर्ण मेनू आणि सोप्या रेसिपी.

Dussehra Special Thali: दसरा म्हणजे विजय, आनंद आणि समृद्धीचा सण. यंदा २० ऑक्टोबर रोजी सर्वत्र विजयादशमी (Dussehra Naivedya) साजरी केली जाणार आहे. या शुभदिनी देवीला पारंपरिक आणि स्वादिष्ट नैवेद्य अर्पण (Dussehra Special Naivedya Thali for Goddess Durga) करण्याची प्रथा आहे. यंदा तुम्हीही पुरणपोळीपासून कटाच्या आमटीपर्यंतची खास नैवेद्य थाळी (Indian Festival Food) तयार करा. चला, जाणून घेऊया संपूर्ण मेनू (Goddess Durga Naivedya) आणि सोप्या रेसिपी (Dussehra Recipes) .

हेही वाचा: Gokul Election Result 2026: गोकुळमध्ये सतेज पाटलांचा ‘पॉवर प्ले’; १४ जागांच्या आघाडीने राजकीय समीकरणे बदलली!

पुरणपोळी

दसऱ्याच्या नैवेद्यात पुरणपोळीला (Puran Poli Recipe for Vijayadashami) विशेष स्थान आहे. चण्याची डाळ मऊ शिजवून त्यात गूळ, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून स्वादिष्ट पुरण तयार करा. गव्हाच्या कणकेत हे पुरण भरून तूप लावून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. गरमागरम पुरणपोळीवर साजूक तूप घालून देवीला नैवेद्य दाखवा.

कटाची आमटी

पुरणपोळीसोबत कटाची आमटी हा मराठमोळ्या जेवणाचा अविभाज्य भाग आहे. डाळ शिजवताना राहिलेले पाणी वापरून त्यात गोडा मसाला, लाल तिखट, चिंचेचा कोळ, गूळ आणि मीठ घाला. मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि लसूण यांची फोडणी देऊन आमटीला छान उकळी आणा.

बटाट्याची सुकी भाजी

उकडलेल्या बटाट्याचे तुकडे करून मोहरी, जिरे, हिंग, हिरवी मिरची आणि हळदीची फोडणी द्या. त्यात बटाटे, मीठ आणि थोडी साखर घालून परता. शेवटी कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस घालून भाजी अधिक चवदार बनवा.

हेही वाचा: Tiger Shroff Fitness: ना शॉर्टकट, ना क्रॅश डाएट! टायगर श्रॉफ असा राखतो फिटनेस, जाणून घ्या त्याचं डाएट रुटीन

वरण-भात

साधे वरण आणि गरमागरम भात हे कोणत्याही सणाच्या जेवणाचे आकर्षण असते. तुरीची डाळ शिजवून त्यात हिंग, जिरे, हळद आणि तुपाची फोडणी द्या. गरम भातावर साजूक तूप घालून नैवेद्यात वाढा.

कुरकुरीत भजी

बेसनात तिखट, हळद, मीठ, ओवा आणि चिमूटभर बेकिंग सोडा घालून पीठ तयार करा. बटाटा, कांदा किंवा मिरचीचे काप या पिठात बुडवून गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळा. गरमागरम भजी नैवेद्याच्या थाळीची चव वाढवतात.

पापड, लोणचे आणि कोशिंबीर

थाळीत कुरकुरीत पापड, घरचे लोणचे, काकडी-टोमॅटोची कोशिंबीर आणि लिंबाची फोड यांचा समावेश केल्यास जेवण अधिक रुचकर होते. यासोबत दही किंवा ताकही वाढू शकता.

हेही वाचा: रोहित-विराट नव्हे, वैभव सूर्यवंशीने वेधलं लक्ष! विमानतळावरील VIDEO पाहिलात का?

गोडाचा शेवट

पुरणपोळीसोबत श्रीखंड, बासुंदी किंवा शेवयांची खीर यापैकी कोणताही गोड पदार्थ नैवेद्यात ठेवू शकता. त्यामुळे थाळी अधिक समृद्ध आणि सणासुदीची वाटते.

अशी सजवा नैवेद्य थाळी

मोठ्या ताटात प्रथम केळीचे पान किंवा स्वच्छ पान ठेवा. त्यावर पुरणपोळी, कटाची आमटी, वरण-भात, बटाट्याची भाजी, भजी, पापड, लोणचे, कोशिंबीर, दही आणि गोड पदार्थ आकर्षक पद्धतीने वाढा. तुळशीचे पान आणि साजूक तूप ठेवून देवीला नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर संपूर्ण कुटुंबासोबत या पारंपरिक दसरा स्पेशल जेवणाचा आनंद घ्या.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts