Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • Navratri Upvas Recipes : नवरात्री स्पेशल उपवासाचे पदार्थ; साबुदाणा खिचडीपासून मखाण्याच्या खिरीपर्यंत, जाणून घ्या खास रेसिपी!
Top News

Navratri Upvas Recipes : नवरात्री स्पेशल उपवासाचे पदार्थ; साबुदाणा खिचडीपासून मखाण्याच्या खिरीपर्यंत, जाणून घ्या खास रेसिपी!

Navratri Special Upvas Recipes: उपवासात केवळ चव नव्हे, तर शरीराची ऊर्जा टिकवून ठेवणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे फळे, दूध, दही आणि योग्य प्रमाणात सुकामेवा यांचा आहारात समावेश करता येतो. तळलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत आणि पुरेसे पाणी प्यावे. उपवासाचे नियम प्रत्येकाच्या परंपरेनुसार वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे आपल्या उपवासाच्या पद्धतीनुसार पदार्थ निवडा आणि नवरात्रीत स्वादिष्ट फराळाचा आनंद घ्या.

Traditional Fasting Foods : नवरात्रीचा उत्सव सुरू झाला की घराघरांत देवीच्या पूजेची, आरतीची आणि उपवासाची लगबग पाहायला मिळते. नऊ दिवस अनेक भाविक श्रद्धेने उपवास करतात. मात्र, उपवास करत ना नेमकं काय खावं, जेणेकरून पोटही भरलेलं राहील आणि दिवसभर उत्साहही ( Indian Vrat Food ) टिकून राहील, असा प्रश्न अनेकांना पडतो. अशा वेळी नेहमीच्या साबुदाणा खिचडीऐवजी काही चविष्ट, पौष्टिक आणि झटपट तयार होणारे पदार्थ नक्की करता येईल. उपवासात बटाटा, रताळे, साबुदाणा, राजगिरा, शेंगदाणे आणि वरीच्या तांदळाचा वापर करून विविध पदार्थ (Fasting Snacks)बनवता येतात. जाणून घेवूया उपवासासाठीच्या (Traditional Fasting Foods) खास १० स्वादिष्ट पदार्थ आणि त्याच्या कृती

१. साबुदाणा खिचडी

उपवास म्हटलं की सर्वप्रथम आठवते ती साबुदाणा खिचडी. भिजवलेला साबुदाणा, भाजलेले शेंगदाणे, बटाटा, हिरवी मिरची आणि जिरे यांच्या मदतीने ही खिचडी तयार करता येते. लिंबाचा रस आणि कोथिंबीर घातल्यास तिची चव आणखी वाढते. साबुदाणा योग्य प्रमाणात भिजवल्यास खिचडी चिकट न होता मोकळी होते.

२. साबुदाणा वडा

बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेला साबुदाणा वडा उपवासामध्ये अगदी आवडीने झाला जाणार पदार्थ. लोकप्रिय आणि सतत केला जाणार एक उत्तम पर्याय आहे. साबुदाणा, उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट आणि उपवासाला चालणारे मसाले एकत्र करून वडे तयार करता येतात. कमी तेलात शॅलो फ्राय किंवा एअर फ्राय केल्यास तेलाचा वापर कमी करता येतो. डायट कॉन्शियस लोकांना ही खाता येणार पदार्थ.

३. बटाट्याची भाजी

उपवासाच्या काळात मोठ्यानं बरोबरीने लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. उकडलेल्या बटाट्यांपासून तयार होणारी साधी उपवासाची भाजी हा झटपट तयार होणारा पदार्थ आहे. जिरे, हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट आणि लिंबाचा रस यामुळे भाजीला छान चव येते. ही भाजी राजगिऱ्याच्या भाकरीसोबत किंवा वरीच्या भातासोबत खाता येते.

हेही वाचा :Navratri 2026 Colours : नवरात्रीचे 9 दिवस, 9 रंग; जाणून घ्या संपूर्ण रंगांची यादी

४. रताळ्याचे काप

रताळे हे उपवासासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. रताळ्याचे गोल काप करून त्यावर थोडे तूप, जिरेपूड आणि मीठ लावून तव्यावर भाजावेत. गोडसर चव असलेले हे काप नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी खाता येतात. यामुळे ऍसिडिटी प्रमाण कमी होण्यासाठी मदत होते.

५. राजगिऱ्याची भाकरी

उपवासात पोटभर खाण्यासाठी राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी तयार करता येते. राजगिऱ्याच्या पिठात कोमट पाणी आणि चवीनुसार उपवासाचे मीठ घालून पीठ मळावे. त्यानंतर भाकरी थापून तव्यावर भाजावी.  दह्यासोबत  किंवा  बटाट्याची भाजी सोबत खाल्ली जाते

६. वरीचा भात

वरीच्या तांदळापासून तयार होणारा भात हा हलका आणि सोपा पर्याय आहे. वरीचे तांदूळ स्वच्छ धुऊन जिरे, हिरवी मिरची आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवावेत. दही किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत हा भात खाता येतो.

हेही वाचा: navratri colours : नवरात्रीचे ९ रंग ! पहा कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा

७. साबुदाणा थालीपीठ

साबुदाणा, उकडलेला बटाटा, शेंगदाण्याचा कूट आणि शेंदेलोण एकत्र करून थालीपीठ तयार करता येते. तव्यावर थोडे तूप किंवा तेल घालून ते दोन्ही बाजूंनी भाजावे. दही किंवा उपवासाच्या चटणीसोबत हा पदार्थ स्वादिष्ट लागतो.

८. राजगिरा लाडू

गोड खाण्याची इच्छा झाल्यास राजगिरा लाडू हा चांगला पर्याय आहे. लाह्या केलेला राजगिरा आणि पाकासाठी गूळ वापरून लाडू तयार करता येतात. मात्र, गूळ आणि साखर यांचे प्रमाण लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

९. मखाण्याची खीर 

दूध, मखाणे, वेलची आणि आवडीनुसार थोडा गूळ किंवा साखर वापरून मखाण्याची खीर बनवता येते. मखाणे थोडे भाजून दुधात शिजवल्यास खिरीला छान चव येते. उपवासात गोड पदार्थ खाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा: Navratri History : नवरात्रीचा इतिहास, विज्ञान आणि नऊ रंगांचं महत्त्व जाणून घ्या!

१०. दह्याचे बटाटे

उकडलेले बटाटे, दही, जिरे आणि हिरवी मिरची वापरून ही चविष्ट डिश तयार करता येते. दह्यामुळे पदार्थाला आंबटसर चव मिळते. उपवासाच्या पद्धतीनुसार योग्य मसाले आणि साहित्य वापरून हा पदार्थ बनवता येतो.

उपवास करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

नवरात्रीत उपवास करताना केवळ फराळाचे पदार्थ खाण्याऐवजी आहारात फळे, दूध, दही, शेंगदाणे आणि इतर योग्य पदार्थांचा समतोल ठेवा. पुरेसे पाणी प्या आणि एकाच वेळी खूप तळलेले पदार्थ खाणे टाळा. उपवासाचे नियम प्रत्येक कुटुंबात आणि परंपरेनुसार वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे त्यानुसार पदार्थ निवडा. यंदाच्या नवरात्रीत या १० स्वादिष्ट पदार्थांच्या मदतीने उपवासात आणा चवदार बदल! श्रद्धा जपत आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या आवडीनुसार आणि शरीराला योग्य ठरतील असे पदार्थ निवडून नवरात्रीचा उत्सव आनंदात साजरा करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts