Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • लावणीच्या ठेक्यावर थिरकणारी पावलं कायमची थांबली! ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं वयाच्या ७३व्या वर्षी निधन
मनोरंजन

लावणीच्या ठेक्यावर थिरकणारी पावलं कायमची थांबली! ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं वयाच्या ७३व्या वर्षी निधन

Madhu Kambikar Death News
Madhu Kambikar Death News: मराठी चित्रपटसृष्टी आणि लोककलेच्या क्षेत्रातून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलावंत मधू कांबीकर यांचं वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी मनोरंजनविश्वावर (Marathi Actress) अजून एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर आता आणखी एका दिग्गज कलावंताच्या निधनाची बातमी समोर आली आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि ठसकेबाज लावणीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर (Madhu Kambikar Death) यांनी वयाच्या ७३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीसह लोककलेच्या क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे.चला तर जाणून घेऊयात नेमकं काय घडलं?

हेही वाचा: IPO गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! Zetwerk इश्यूचा प्राइस बँड जाहीर, GMP किती? जाणून घ्या

मधू कांबीकर यांचे नाव घेताच डोळ्यांसमोर उभी राहते ती त्यांच्या अभिनयातील सहजता आणि लावणी सादर करण्याची खास शैली. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली, ज्यानंतर त्यांना रंगमंचापासून दूर व्हावे लागले.

मधू कांबीकर या २७ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ‘लावण्य संगीत’ हा कार्यक्रम (Lavani Artist)  आयोजित करण्यात आला होता. तब्बल १० ते १२ वर्षांच्या विश्रांतीनंतर मधू कांबीकर पुन्हा एकदा लावणी सादर करण्यासाठी मंचावर उतरल्या होत्या. या कार्यक्रमासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली होती.

कार्यक्रमात त्यांनी दोन नृत्ये सादर केली. त्यानंतर भैरवी सादर करताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी आपले सादरीकरण पूर्ण केल्याचे माहिती समोर आली. मात्र, त्यानंतर घडलेल्या घटनेने त्यांच्या आयुष्याला वेगळीच दिशा दिली. ( Marathi Entertainment News)

हेही वाचा: बुधाच्या नक्षत्र बदलाने ५ राशींचे नशीब उजळणार? ३ नोव्हेंबरपर्यंत धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगतीचे संकेत!

नेमकं काय घडलं?

कार्यक्रम संपल्यानंतर मधू कांबीकर मेकअप रूममध्ये गेल्या. तिथे त्यांना झटका आल्याची माहिती समोर आली. त्यांचा उजवा हात बधीर झाल्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईतील परळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तपासणीनंतर त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे समोर आल्याचे माहिती समोर आली आहे. सुरुवातीला उपचारांना प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या घटनेचा त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला. त्यानंतर त्यांना पूर्वीप्रमाणे अभिनय आणि नृत्य क्षेत्रात सक्रिय राहता आले नाही.

कलेतून वेगळी ओळख

मधू कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी मनोरंजनविश्वात स्वतःची ओळख निर्माण केली. कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर १९७३ मध्ये मुंबईतील लालबाग येथील न्यू हनुमान थिएटरमधून त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली.

लावणी, लोकनाट्य आणि नृत्याच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यात योगदान दिले. त्यांच्या सादरीकरणात असलेली ऊर्जा, चेहऱ्यावरील भाव आणि अभिनयातील नैसर्गिकता यामुळे त्यांना रसिकांचे विशेष प्रेम मिळाले.

हेही वाचा: नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूड कलाकार का नव्हते? प्रवीण तरडे काय म्हणाले? 

मराठी चित्रपटांमधील भूमिका आजही स्मरणात

मधू कांबीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. ‘शापित’, ‘हेच माझं माहेर’, ‘ह्योच नवरा पाह्यजे’, ‘झपाटलेला’, ‘एक होता विदूषक’ आणि ‘रावसाहेब’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या कामाची विशेष दखल घेतली गेली.

मराठी चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटांतही अभिनय केला. चित्रपट, नाटक आणि लोकनाट्य या वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांनी आपल्या कलेची छाप उमटवली. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कारांनीही गौरवण्यात आले

लावणीची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न

मधू कांबीकर यांच्यासाठी लावणी ही केवळ मनोरंजनाची कला नव्हती, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग होती. ‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी लावणी रसिकांपर्यंत पोहोचवली. या कार्यक्रमाचे प्रयोग परदेशातही झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts