UIDAI Uday mascot : युनिक आयडेंटीफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आज उदय या नवीन आधार मॅस्कॉटचे अधिकृतपणे अनावरण केले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आधार संबंधित अडचणी असल्यास आधार सेवा यांची माहिती अधिक सोप्या पद्धतीने देता येईल यासाठीच हा मॅस्कॉट लॉन्च कऱण्यात आला आहे.
काय आहे उदय मॅस्कॉट
उदय हा आधारकार्ड संबंधित सर्व सेवा, अपडेट्स आणि ऑथेंटिकेशन, ऑफलाईन पडताळणी, माहिती शेअर करणे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर तसेच सामान्य नागरिकांच्या अडचणी सरळ–सोप्या भाषेत समजावून सांगणे यासाठी बनवण्यात आले आहे.
हे ही वाचा : केंद्र की राज्य; आठव्या वेतन आयोगात कोणाचा पगार सर्वात आधी वाढेल?
स्पर्धेचे करण्यात आले होते आयोजन
UIDAI ने myGov या प्लॅटफॉर्मवर राष्ट्रीयस्तरावर डिझाईन आणि नाव स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या माध्यमातून 875 नोंदी प्राप्त झाल्या. त्यानंतर निपक्ष आणि काटेकोर निवड प्रक्रियेनंतर उदय या मॅस्कॉटची निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
myGov या प्लॅटफॉर्मवर घेण्यात आलेल्या डिझाईन स्पर्धेत केरळ येथील अरुण गोकुळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इद्रिस दवईवाला यांनी दुसरा उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील कृष्णा शर्मा यांनी तिसरा क्रमांक मिळवला. तर मॅस्कॉटच्या नावाच्या स्पर्धेत भोपाळच्या रिया जैन यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून दुसरा आणि तिसरा क्रमांक अनुक्रमे पुण्याचे इद्रिस दवईवाला, आणि हैद्राबादचे महाराज सरन चेल्लापिल्ला यांनी पटकावला आहे.
Meet the new face of Aadhaar ‘Udai’— your friendly companion to digital identity!
#Aadhaar #UIDAI #AadhaarMascot #MascotLaunch #MeraAadhaarMeriPehchaan #DigitalIdentity #DigitalIndia pic.twitter.com/crILR5gB6J— Aadhaar (@UIDAI) January 8, 2026
आधार संवाद सोपी करण्यास मदत करणार
तिरुवनंतपुरम याठिकाणी झालेल्या UIDAI च्या कार्यक्रमावेळी UIDAI चे अध्यक्ष नीलकंठ मिश्रा यांनी उदय या मॅस्कॉटचे लॉन्चिंग केले. आणि विजेत्यांचा सत्कार केला. यावेळी ते म्हणाले, मॅस्कॉटची सुरुवात ही आधार संवाद सोपी करण्यास मदत करेल. हे मॅस्कॉट सर्वसमावेशक आणि देशातील अब्जावधी नागरिकांसाठी अधिकच आपुलकीची बनण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल आहे.
उदय हा आता नागरिकांसाठी एक साथीदार
या कार्यक्रमावेळी UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार म्हणाले कि, आधारचा मूलभूत सिद्धांत खुल्या गटासाठीच्या राष्ट्रीय स्पर्धेद्वारे नागरिकांना सहभागी करून घेणे हा आहे. तर UIDAI चे उपमहानिदेशक विवेक सी. वर्मा यांनी नमूद केले की, “उदय हा आता नागरिकांसाठी एक साथीदार आणि कथनकर्ता म्हणून काम करेल, ज्यामुळे आधारविषयक माहितीशी लोक सहजपणे जोडले जातील.”












