सर्वसामान्यतः एखाद्या व्यक्तीला राग येणे ही साधारण बाब आहे. परंतु जर तीव्र स्वरूपात आणि वारंवार एखाद्या व्यक्तीला राग येत असेल तर हे भयानक असू शकते. याचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील होऊ शकतो. कोणत्याही ठोस कारणाशिवाय राग येणे अन्यथा रंगाचे स्वरूप अतिशय तीव्र असेल तर हा राग मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. परंतु ही समस्या असण्यामागे नेमके कारण काय आहे? हा प्रश्न उद्भवतो.
आजकालच्या पिढीचे राहणीमान, बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपूर्ण झोप, ताणतणाव, शरीरातील व्हिटॅमिसची कमतरता, या सर्व गोष्टींचा आपल्या मेंदूchya कार्यप्रणालीवर परिणाम होत असतो. याचमुळे आपली चिडचिड, ताणतणाव आणि वारंवार राग येणे यासारख्या समस्या उद्भवतात. या सर्व समस्या कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतात हे तुम्हाला ऐकायचं असेल तर या लेखात जाणून घ्या सविस्तर माहिती.
व्हिटॅमिन B6
तुमच्या शरीरात जर व्हिटॅमिन B6 या व्हिटॅमिनची कमी असेल तर तुम्हाला राग येऊ शकतो. जर मेंदूच्या भागात सेरोटोनिन आणि डोपामाइन यासारखे न्युरोट्रान्समीटर तयार होण्यासाठी मदत मिळते. यामुळे तुमचा मूड चांगला राहू शकतो. परंतु व्हिटॅमिन बी6 या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुम्ही चिडचिड, अस्वस्थता, निद्रानाश यासारख्या समस्यांमुळे तुम्ही परेशान होऊ शकतात. आणि याचा परिणाम तुमच्या रागावर होऊ शकतो. आणि विनाकारण तीव्र स्वरूपात तुम्हाला राग येऊ शकतो.
व्हिटॅमिन B12
व्हिटॅमिन B12 हे डीएनए निर्मिती आणि पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन B12 मुळे मेंदूची कार्यप्रणाली सुरळीत कार्य करते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे थकवा, नैराश्य आणि एकाग्रतेशी संबंधित समस्या निर्माण होतात.
व्हिटॅमिन D
राग येणे आणि मूड स्विंग मध्ये व्हिटॅमिन डी चा मोठा वाटा आहे. व्हिटॅमिन D मुळे हाडे मजबूत होण्यास मदत होतेच पण याशिवाय व्हिटॅमिन डी मुळे आपल्या मूडवरही परिणाम दिसून येतो. तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर नैराश्य आणि चिडचिडेपणाची समस्या निर्माण होऊ शकते.
या पदार्थाचे सेवन करा
तुम्ही रोज संतुलित आहार घेतल्यास व्हिटॅमिन B6, व्हिट्यामिन बी 12 , व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण होऊ शकते. यासाठी आहारात हिरव्या भाज्या, अख्खे धान्य, अंडे, मासे, दूध आणि सुकामेवा यासारख्या गोष्टींचा समावेश करा. तसेच
शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर नियमित सकाळी कमीत कमी 15 मिनिटे कोवळ्या उन्हात बसल्यास तुम्हाला सूर्यप्रकाश मिळेल आणि या व्हिटॅमिनची कमतरता सुद्धा पूर्ण होईल. याशिवाय दररोज व्यायाम करणे देखील गरजेचे आहे. मानसिक आरोग्यासाठी नियमित ध्यानधारणा करणे, आणि योगासनांचा सराव करणे गरजेचे आहे. यामुळे आजारांपासून शरीर निरोगी राहते आणि मेंदू देखील शांत होण्यास मदत मिळेल.