Wholesale Jeans Markets in India: जीन्स फॅशनची प्रेमींसाठी उत्तम बातमी आहे. भारतात असे काही होलसेल मार्केट्स आहेत जिथे तुम्हाला ब्रँडेड आणि स्टायलिश जीन्स अगदी बजेटमध्ये मिळू शकतात. स्वस्त दरांवर ट्रेंडनुसार कपडे खरेदी करण्यासाठी ही ठिकाणे परफेक्ट आहेत.
जीन्स हे आजच्या फॅशनमध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी अनिवार्य झाले आहे. सुरुवातीला कामगार आणि माइनर्ससाठी टिकाऊ कपड्यांमुळे जीन्स वापरली जात असे, पण आता ती फक्त पॅन्ट नव्हे तर स्टाइलसाठीही अत्यंत लोकप्रिय झाली आहे. भारतात अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला ट्रेंडनुसार स्टायलिश जीन्स खूपच स्वस्तात घेऊ शकतात. चला पाहूया टॉप काही होलसेल मार्केट्स
हेही वाचा: भारतात लवकरच लॉन्च होणार नवीन इलेक्ट्रिक SUV; ‘Thar’ ला मिळणार थेट टक्कर
तुळशी बाग (पुणे)
पुण्यातील तुळशी बागे देखील तुम्हाला होलसेल मार्केट आहे. येथे तुमहाला जीन्स, टॉप सह अन्य वस्तू खूप कमी बजेट मध्ये मिळतात.
सरोजिनी मार्केट (दिल्ली)
सरोजिनी नगर मार्केट हे महिलांच्या कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे, पण पुरुषांसाठी देखील स्टायलिश कपडे मिळतात. येथे जीन्स फक्त २०० रुपयांपासून मिळतात. मार्केटमध्ये प्रत्येक सीझननुसार ट्रेंड बदलत राहतो, त्यामुळे येथे नेहमी नवीन डिझाइन्स उपलब्ध असतात.
उल्लासनगर (मुंबई)
मुंबईत डेनिम आणि जीन्ससाठी प्रसिद्ध मार्केट म्हणजे उल्लासनगर. येथे फॅशनेबल जीन्स खूप स्वस्तात मिळतात. फक्त जीन्सच नव्हे, तर टी- शर्ट्स, वन पीस आणि इतर कपडे देखील खूप कमी किमतीत मिळतात.
सुरत (गुजरात)
गुजरात येथील सुरत हे भारतातील प्रमुख कपडा उत्पादन केंद्र असून, जीन्स उत्पादनात देशाचा दुसरा सर्वात मोठा केंद्र आहे. येथे तुम्हाला जीन्स असो किंवा अन्य स्टायलिश पॅन्ट ३००-४०० रुपयांपासून मिळतात. शहरात मोठ्या प्रमाणावर कपड्यांचा उद्योग आहे. येथे तुम्हाला कपड्यांसोबत ८० रुपयांपासून साड्या देखील मिळू शकतात.












