• Home
  • महाराष्ट्र
  • पुण्यात पेट्रोल दरवाढीचा भडका; इराण-इस्रायल युद्धाचा थेट परिणाम, नागरिक त्रस्त
Pune

पुण्यात पेट्रोल दरवाढीचा भडका; इराण-इस्रायल युद्धाचा थेट परिणाम, नागरिक त्रस्त

pune petrol

Pune Petrol Price Hike | सध्या इस्त्रायल (Israel), अमेरिका (US) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. या युद्धामुळे अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये भारतालाही (India) मोठा झटका मिळाला आहे. मध्य पूर्वेतील या युद्धाचा थेट परिणाम पुणे शहरावर झाला आहे. पुणेकरांना (Pune) मोठा धक्का बसला आहे. कारण पुण्यात इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

हेही वाचा – रुपाली चाकणकर फरार? रुपाली पाटील ठोंबरे यांची खळबळजनक पोस्ट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुण्यात पेट्रोलच्या दरात किती रूपयांनी झाली वाढ?

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात आजपासून (20 मार्च) प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे पुणेकरांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

पेट्रोलिय कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात आता स्पीड आणि पॉवर यांसारख्या प्रीमियम असलेल्या पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. स्पीड आणि पॉवर यांसारख्या प्रीमियम असलेल्या पेट्रोलच्या दरात आता प्रति लिटर 2.09 रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. याआधी या पेट्रोलचा दर 111.68 रूपये प्रति लिटर एवढा होता, तर आता या पेट्रोलच्या दरात 113.77 रूपये प्रति लिटर एवढी वाढ करण्यात आली आहे.

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण या देशांमधील संघर्ष तीव्र होत चालला आहे. हा संघर्ष तीव्र झाल्यामुळे गॅस आणि तेल उत्पादन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या युद्धात ऊर्जा प्रकल्पांवर मोठे हल्ले झाल्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुणेकरांना मोठा धक्का बसला असून आता त्यांना पेट्रोलसाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत.

दरम्यान, इस्राइल आणि इराण या देशांमध्ये युद्ध (Israel-Iran War) सुरु झाल्यापासून कच्चा तेलाच्या किंमती 65 ते 75 डॉलरदरम्यान होत्या. आज या किंमती 100 डॉलरच्या पुढे पोहचल्या आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एका वर्षात होणारी वाढ अवघ्या एका महिन्यात झाली आहे. कच्चा तेल्याच्या किंमतीत 43 टक्क्यांहून अधिकची उसळी दिसून आली. रोजच्या किंमतीत थोडाफार चढउतार दिसून येत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीही वाढण्याची शक्यता अमेरिकन बेंचमार्ककडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts