Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • हिवाळ्यात असे ठेवा शरीराचे तापमान संतुलित; जाणून घ्या 7 घरगुती टिप्स
लाईफस्टाईल

हिवाळ्यात असे ठेवा शरीराचे तापमान संतुलित; जाणून घ्या 7 घरगुती टिप्स

Winter Body Temperature Tips : हिवाळ्यात थंडीचे प्रमाण प्रचंड वाढते. थंड हवा, कोरडी त्वचा, तापमानात होणारे बदल या सर्व बाबींमुळे शरीरा विविध बदल होतात. आणि त्याचा प्रचंड परिणाम शरीरावर जाणवतो. काहींना जास्त थंडी जाणवते तर काहींना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. याशिवाय काही व्यक्तींचे संपूर्ण शरीर थंडगार पडते. याशिवाय जर तुमच्या शरीराचे तापमान असंतुलित असल्यास रोगप्रतिकार शक्ती कमी होते. अशा वेळी हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असते. मग आता तुम्ही म्हणाल रोगप्रतिकारकशक्ती वावण्यासाठी काय करावे ? तर तुम्ही घरच्या घरी काही प्रभावी उपायांचा वापर करून शरीरातील तापमान सहजरित्या नियंत्रित ठेऊ शकतात. जाणून घेऊया या प्रभावी आणि घरगुती 7 टिप्स.

1. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन

हिवाळ्यात थंडीमुळे पाण्याची तहान कमी प्रमाणात लागते. अशावेळी शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे असते. कारण पाणी कमी पिल्याने शरीर लवकर थंड पडते. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पिऊ शकतात. ज्यामुळे शरीरातील रक्तसंचार वाढतो. शरीरात कोमट पाणी पिल्याने पाचक कार्य सुधारण्यास मदत होते. आणि शरीरात उष्णतेची निर्मिती वाढते. जर तुम्ही कोमट पाण्यात आलं, हळद किंवा मध मिसळून त्याचे सेवन करू शकतात. यामुळे तुम्हाला जास्त उबदार ठेवण्यास मदत होईल.

हिवाळ्यात थंडीमुळे पाण्याची तहान कमी प्रमाणात लागते. अशावेळी शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे असते. कारण पाणी कमी पिल्याने शरीर लवकर थंड पडते
हिवाळ्यात असे ठेवा शरीराचे तापमान संतुलित; जाणून घ्या 7 घरगुती टिप्स

2 वार्मिंग फूड्स

हिवाळ्यात शरीराला उष्ण ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे, योग्य आहार. जे खाद्य पदार्थ नैसर्गिक उष्णता प्रदान करतात त्या पदार्थांचे सेवन तुम्ही हिवाळ्यात केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यानुसार तुम्ही प्रामुख्याने लसूण, हळद, ड्रायफ्रूट्स, बदाम, अक्रोड, काजू, खजूर, तीळ, गूळ, शेंगदाणे, रताळे, आले, सूप हॉट मिल्क, गरम दलिया हे पदार्थ तुम्ही सेवन करू शकतात. या पदार्थांमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास आणि दीर्घकाळ उबदारपणा टिकवून ठेवण्यास मदत करतो.

3 उबदार कपडे

हिवाळ्यात उबदार कपडे घालण्या प्राधान्य दिले जाते. परंतु अनेकांना वाटते कि, जॅकेट घातले म्हणजे थंडी वाजणार नाही परंतु हे चुकिचं आहे. कारण ज्या भागाला जास्त थंडी जाणवते तो भाग झाकणे अत्यंत गरजेचे असते. त्यानुसार हात, पाय, कान, मन हे शरीरातील अंगण जास्त थंडी जाणवते. त्यामुळे हिवाळ्या बाहेर पडताना मोजे, हातमोजे, स्कार्फ, टोपी घालणे गरजेचे आहे. या उबदार कपड्यांमुळे शरीरातील तापमान उष्ण राहते.

4 हे पेय आहेत फायदेशीर

हिवाळ्यात बरेच जण गरम पदार्थांच्या सेवन करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे शरीरात उष्णतेची निर्मिती होते. पचनक्रिया सुधारते, रक्ताभिसरण वेगवान होते. तुम्ही हिवाळ्यात आल्याचा चहा, हरबल काढा, गरम दूध, लेमन हनी वॉटर, सूप आणि ब्रॉथचे सेवन करू शकतात. यामुळे शरीराला तात्काळ उबदारपणा मिळतो. आणि यामुळे रोगप्रतिकारण शक्ती वाढण्यास फायदा होतो.

5 तेलाने मसाज

हिवाळ्यात तुम्ही संपूर्ण शरीराची गरम तेलाने मालिश देखील करू शकतात. हा आजी आजोबांच्या काळापासून चालत आलेला घरगुती उपाय आहे. यामध्ये मोहरीचे तेल, नारळ तेल, तिळाचे तेल हे फायदेशीर आहे. हे तेल हलक्या पद्धतीने गरम करून शरीराची आठवड्यातून 23 वेळेस मसाज केल्यास स्नायूमध्ये उष्णता निर्माण होऊ शकते.

6 व्यायाम

थंडीमुळे अनेक जण व्यायाम करणे टाळतात. परंतु हे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. तुम्ही दररोज व्यायाम केल्यास शरीरातील रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते. शरीरात उष्णता निर्माण होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हिवाळ्यात तुम्ही दररोज 20 मिनिटे हलका व्यायाम करू शकतात. जसे कि, ब्रिस्क वॉ , जॉगिंग, योग, सूर्यनमस्कार, स्ट्रेचिंग हे व्यायाम केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.

7 रात्री थंडीचे संरक्षण (Winter Body Temperature Tips)

हिवाळ्यात रात्री थंडी जास्त प्रमाणात जाणवते. त्यामुळे झोपताना थंडी पासून संरक्षण करणाऱ्या गोष्टी अंगीकारणे गरजेचे असते. जेणेकरून झोपताना तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल. त्यासाठी तुम्ही झोपताना जाड ब्लॅंकेटचा वापर करू शकतात. याशिवाय झोपण्यापूर्वी दु पिणे, पायात मोजे घालणे, होत वॉटर बॅग चा वापर करणे या सवयी अंगिकारू शकतात.

रात्री थंडीचे संरक्षण (Winter Body Temperature Tips)
img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts