Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • शिवनिका ट्रस्टला उद्धव ठाकरेंनी पाणी दिली? अंधारेंनी सगळचं सांगून टाकलं..
Top News

शिवनिका ट्रस्टला उद्धव ठाकरेंनी पाणी दिली? अंधारेंनी सगळचं सांगून टाकलं..

Uddhav Thackeray Shivnika Trust controversy

Uddhav Thackeray Shivnika Trust controversy : सध्या अशोक खरात प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यात येत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांवर आरोप सुरू आहेत. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवनिका ट्रस्टला पाणी देण्यात आलं, असा आरोप होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा – “माझ्याकडे दैवी शक्ती आहे…” म्हणत ढोंगी खरातचा नवा कारनामा; करिअर घडवून देण्याच्या आमिषाने तरुणीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त

साप सोडून भुई थोपटण्याचं काम सुरू

मागच्या दोन दिवसांपासून साप सोडून भुई थोपटण्याचं काम सुरू आहे. ज्यामध्ये असं सांगितलं जात आहे की, ठाकरेंच्या काळात शिवनिका ट्रस्टला पाणी देण्यात आलं. खरचं ठाकरेंच्या काळात शिवनिका ट्रस्टला पाणी देण्यात आलं का? नेमकं काय घडलं होतं? हे आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे. मी तो जीआर देखील आपल्याला देऊ शकते.

इथे तर आम्ही खरातला पाणी दिलच नव्हतं

2020 ला मीर गावच्या सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभेत एक ठराव केला होता. आत हा ग्रामसभेचा ठराव जोडलेला आहे. पिण्याचं पाणी देणं ही माणूसकी आहे. समजा एखादा कैदी 302 च्या गुन्ह्यात जेलमध्ये आहे, आणि जेलरने जर त्याला पिण्यासाठी पाणी दिलं, म्हणजे जेलर त्याच्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे, असं होत नाही. इथे तर आम्ही खरातला पाणी दिलच नव्हतं, असं यावेळी अंधारे यांनी म्हटलं आहे.

ग्रामसेभेच्या ठरावाला अनुसरून पाणी दिलं

ग्रामसभेचा ठराव होता. ग्रामसेभेच्या ठरावाला अनुसरून पाणी देण्याचं ठरलं होतं. किती पाणी तर प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतेनं पाणी द्यायचं ठरलं होतं. याला शिफारस कोणी केली तर अर्थात ती रुपाली चाकणकर यांनी केली होती. मिरगावच्या लोकांना पाण्याची गरज होती म्हणून तेव्हाचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडून हा जीआर पारीत झाला.

तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते

तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, परंतु हा विषयच मुख्यमंत्र्यांकडे येत नाही आता त्यानंतर ही पाण्याची पाईपलाईन जर शिवनिका ट्रस्टलाकडे वळवण्यात आली असेल तर त्याला कसं काय कोण जाबाबदार राहील? असा सवाल यावेळी अंधारे यांनी केला.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts