मुंबई : बांगलादेश मधून बेकायदेशीररीत्या लोकांना भारतात आणण्यासाठी मोठे रॅकेट चालवणा-या किन्नरला मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत अरेस्ट केले आहे. पोलिसांनी या कारवाईत आधारकार्ड आणि पॅनकार्ड तपासले असता सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बांगलादेशी किन्नरांची गुरु माँ सुमारे 30 वर्षांपासून या बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात (India) वास्तव्य करत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबू अयान शेख उर्फ ज्योती उर्फ गुरु माँ असे या आरोपीचे नाव आहे. ज्योती उर्फ गुरु माँ बेकायदेशीररीत्या लोकांना भारतात आणण्याचे रॅकेट चालवत होती. तिने आता पर्यंत 200 पेक्षा जास्त अधिक बांगलादेशी नागरिकांना भारतात आणल्याची माहिती समोर आली आहे.
गुरु माँ हिने स्वतःला भारतीय नागरिकत्व दाखवण्यासाठी जन्म दाखला, आधार कार्ड आणि पॅन कार्ड यासारखे बरेच कागदपत्रे बनावटरित्या तयार करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर तिला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.
गुरु माँ सुरुवातीला पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद सीमेवरून लोकांना अवैधपणे भारतात आणत होती. यानंतर पुढील प्रक्रियेसाठी त्या लोकांना कोलकाता याठिकाणी 4 ते 5 दिवस थांबवून बनावट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि जन्म दाखले बनवण्यात येत होते. त्यानंतर मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना ‘ज्योति’ उर्फ गुरु माँ त्यांना शिवाजी नगर परिसरात वास्तव्यास ठेवत होती. या ‘गुरु मा’ चे मुंबईच्या काही भागांमध्ये ३०० पेक्षा जास्त अनुयायी पसरलेले असून मुंबईत आल्यावर, एकाच खोलीत ३ ते ४ लोकांना ठेवून त्यांच्याकडून ती ५,००० ते १०,००० रुपये महिना वसूल करत होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘ज्योति’चे काम फक्त अवैध घुसखोरी आणि बनावट कागदपत्रे बनवणे एवढेच नव्हे तर म्हाडाचे फ्लॅट आणि झोपडपट्ट्या हडप करण्यासारख्या गुन्ह्यांमध्ये देखील तिचा हाथ होता. भयानक म्हणजे एक घर खाली करण्यासाठी ती १ ते २ लाख रुपये वसूल करण्यात येत होते. ‘गुरु मा’ ने २०० पेक्षा अधिक घरांवर कब्जा केला असून अनेक लोकांना तृतीयपंथी देखील बनवल्याची माहिती समोर आली आहे.