Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • आता ब्लिंकिंटवरून मिळणार नाही 10 मिनिटात डिलिव्हरी; केंद्र सरकारचा गिग वर्कर्सच्या आंदोलनावर महत्वपूर्ण निर्णय
बिजनेस

आता ब्लिंकिंटवरून मिळणार नाही 10 मिनिटात डिलिव्हरी; केंद्र सरकारचा गिग वर्कर्सच्या आंदोलनावर महत्वपूर्ण निर्णय

Blinkit delivery partner during gig workers protest over 10 minute delivery

Blinkit 10 minute delivery ban : आजकाल ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य दिले जाते. त्यानुसार अने ऍप्लिकेशनच्या माध्यमातून घरबसल्या ग्राहक शॉपिंग करत असतात. जसे कि फ्लिपकार्ट, मिशो, मिंत्रा आणि असे बरेच ऑनलाईन शॉपिंग ऍप्स आहे. याशिवाय तुम्हाला किराणा सामान किंवा काही वस्तू 10 मिनिटांच्या आत हव्या असतील तर ब्लिंकि, स्वीगी सारखे अनेक ऑनलाईन एप्लिकेशन उपलब्ध आहे. जेणेकरून काही मिनिटात तुम्हाला तुमची ऑर्डर डिलिव्हरी केली जाते. परंतु आता सरकारकडून ही 10 मिनिटात डिलिव्हरी स्कीम बंद करण्यात येणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून गिग वर्कसचा संप सुरु आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असलेले 10 मिनिटां डिलिव्हरी हा पर्याय तात्काळ हटवण्याची मागणी केली होती. त्यानुषंगाने आता ऑनलाईन डिलिव्हरी अँप ब्लिंकिने त्यांच्या वेबसाइटवरून हा पर्याय हटवल्याचे निदर्शनासले आहे. तर गिग वर्कर्स युनियनच्या अध्यक्षांनी देखील हि मागणी मान्य करत कारवाई केली आहे. 10 मिनिटात डिलिव्हरी हा पर्याय कामगारांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक आहे. यामुळे गिग वर्कर्सवर ताण निर्माण होतो.

हे ही वाचा : सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर अखेर बाजारात तेजी; सेन्सेक्स 302 तर निफ्टी 107 अंकांनी वधारला

…अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

काही महिन्यांपासून सुरु असलेल्या या आंदोलनात युनियनने गंभीर आरोप लगावले आहे. 10 मिनिटांच्या आत डिलिव्हरी करणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असून यामुळे गिग वर्कर्सचा अपघात होण्याचे चान्सेस जास्त आहे. कारण 10 मिनिटांच्या आत डिलिव्हरी पोहोचवणे भाग असल्यामुळे वेगमर्यादा तोडून डिलिव्हरी करणे भाग असते. कामगारांच्या हक्कासाठी होणाऱ्या संपापूर्वी युनियनने सरकार आणि संबंधित कंपन्यांना इशारा देण्यात आला असून कामगारांची सुरक्षितता, न्याय वेतन, कामाचे योग्य तास या सर्वांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी युनियनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अन्यथा हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता असून तसा इशारा या युनियनने दिला आहे.

ब्लिंकिसह अनेक कंपन्यांनी हटवला दावा

ऑनलाईन बाजारपेठेत 10 मिनिटात डिलिव्हरी या जाहिरातबाजीला आता लगाम घातला असून या आंदोलनाची दाखल आता केंद्र सरकारने घेतल्याचे दिसत आहे. याबाबत केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी याप्रकरणा पुढाकार घेतला आहे. आणि ऑनलाईन कंपन्यांना याबाबत कडक निर्देश देण्यात आले आहे. एवढेच नाही तर आता ब्लिंकि या ऑनलाईन डिलिव्हरी कंपनीसह अनेक कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून 10 मिनिटात सामान घरपोच पोहोचवण्याचा दावा हटवला आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts