गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून मोठी बातमी आली आहे. वरिष्ठ नक्षलवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती आणि इतर 60 नक्षलवादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना आत्मसमर्पण केलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही घोषणा केली. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हे नक्षलवादी पोलिसांना शरण गेले आहेत.
काय म्हणाले पोलीस :
गडचिरोली जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्यानं वृत्तसंस्था पीटीआयला सांगितलं की, नक्षलवाद्यांनी काल रात्री उशिरा आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) च्या केंद्रीय समितीचा एक सदस्य आणि विभागीय समितीचे 10 सदस्य समाविष्ट आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू हा माओवादी संघटनेच्या सर्वात प्रभावशाली रणनीतीकारांपैकी एक मानला जात होता आणि महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर प्लाटून ऑपरेशन्सवर त्यानं दीर्घकाळ देखरेख केली होती. मात्र त्यांनी म्हटलं आहे की अलिकडच्या काही महिन्यांत त्याच्या आणि उच्च नक्षलवादी नेतृत्वातील वाढत्या मतभेदांमुळं अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे.
#WATCH | Gadchiroli, Maharashtra: Naxalites surrender in front of CM Devendra Fadnavis at the Gadchiroli Police Police Headquarters. Around 60 surrendered today, including Naxal Commander Mallojula Venugopal Rao alias Bhupati surrendered today. pic.twitter.com/DoZucnsWGH
— ANI (@ANI) October 15, 2025
गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण :
वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू यांनी दावा केला होता की सशस्त्र संघर्ष अयशस्वी झाला आहे आणि कमी होत चाललेला सार्वजनिक पाठिंबा आणि शेकडो कार्यकर्त्यांचं नुकसान झाल्याचं कारण देत शांतता आणि संवादाचं आवाहन केलं होतं. सूत्रांनी सांगितलं की, त्यांच्या या भूमिकेला इतर वरिष्ठ नक्षलवादी कार्यकर्त्यांनी विरोध केला होता, त्यांनी दुसऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली लढा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय नक्षलवादी नेतृत्वाच्या दबावाखाली भूपतीनं अखेर शस्त्रं टाकण्यास सहमती दर्शविली, संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आणि आपल्या समर्थकांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.
हे हि वाचा : राजस्थानच्या जैसलमेरमध्ये धावत्या बसला आग; 20 प्रवाशांचा जळून कोळसा
पत्नीनंही केलं होतं आत्मसमर्पण :
अलिकडच्या काही महिन्यांत, गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाची मालिका सातत्यानं सुरु आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, भूपतीची पत्नी तारक्का हिनंही आत्मसमर्पण केलं. ती बंदी घातलेल्या चळवळीच्या दंडकारण्य विशेष प्रादेशिक समितीची सदस्य होती. यावेळी शरणागती पत्करणाऱ्या माओवाद्यांनी त्यांचे शस्त्र मुख्यमंत्र्यांना सोपवले आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना संविधानाची प्रत सुपर्द केली.