Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • HSRP नंबरप्लेट बसवली नसेल तर होणार दंडात्मक कारवाई; कारवाई टाळण्यासाठी करा हा उपाय
Top News

HSRP नंबरप्लेट बसवली नसेल तर होणार दंडात्मक कारवाई; कारवाई टाळण्यासाठी करा हा उपाय

HSRP number plate installed on vehicle as per traffic rules

HSRP number plate penalty : राज्य परिवहन विभागाने महाराष्ट्रातील वाहनधारकांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट म्हणजेच HSRP बसवण्यासाठी अंतिम मुदत दिली होती. आता ही अंतिम मुदत संपली 31 डिसेंबर रोजी संपली असून परिवहन विभागाने आता कडक कारवाई करण्या सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रातील वाहनधारकांना उच्च सुरक्षा प्लेट HSRP बसवण्यासाठी मुदतवाढ देऊन देखील अनेक वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवलेली नाही. 31 डिसेंबर ही नंबर प्लेट बसवण्याची मुदत उलुटन गेल्याने आता आरटीओ (RTO) प्रशासनाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुषंगाने आता परिवहन विभागाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

5 वेळेस दिली मुदतवाढ

आतापर्यंत राज्य परिवहन विभागाने 5 वेळेस मुदतवाढ दिली होती. त्यापैकी पहिली मुदत 31 मार्च 2025, दुसरी मुदत 30 जून 2025, तिसरी मुदत 15 ऑगस्ट 2025, चौथी मुदत 30 नोव्हेंबर 2025 आणि अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत दिली होती. परंतु हि अंतिम मुदत संपून 5 दिवस उलटले आहे. आता 2026 वर्षाच्या सुरुवातीला ज्या वाहनांवर नवीन नंबर प्लेट नसेल, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

हे ही वाचा : बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणाचा निषेध; महाविकास आघाडीचे मुक आंदोलन, भाजपवर गंभीर आरोप

होणार दंडात्मक कारवाई

राज्य परिवहन मंडळाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करणार आहे. त्यानुसार प्रथम उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना 1000 रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. तर दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास 5000 ते 10000 रुपयांची रक्कम भरावी लागेल. वाहनांची चोरी रोखण्यासाठी HSRP नंबरप्लेट महत्वाची आहे.

दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी काय कराल

तुम्हाला ही कारवाई टाळायची असल्यास सर्वप्रथम राज्य परिवहन विभागाच्या अधिकृत पोर्टल transport.maharashtra.gov.in यावर भेट द्या. त्यानंतर तुमच्या वाहनाची माहिती भरून ऑनलाइन नोंदणी करा. तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला मिळणारी ऑनलाइन पावती तुमच्याकडे जपून ठेवा. आणि जर रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी तुम्हाला अडवले आणि तुमच्याकडे ही पावती असेल, तर तुमच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात येणार नाही.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts