Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणाचा निषेध; महाविकास आघाडीचे मुक आंदोलन, भाजपवर गंभीर आरोप
गुन्हा

बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणाचा निषेध; महाविकास आघाडीचे मुक आंदोलन, भाजपवर गंभीर आरोप

MVA leaders stage silent protest over Balasaheb Sarwade murder case

Balasaheb Sarwade murder case protest : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शहरात मुक आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काळ्या फिती लावून भाजप विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

राजकीय वादातून बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा गंभीर दावा केला आहे. या घटनेत एका निरागस व्यक्तीचा जीव गेला असून, पीडित कुटुंबाच्या पाठीशी महाविकास आघाडी कायम उभी राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

हे ही वाचा : सोलापूरात बाळासाहेब सरवदे कुटुंबियांच्या सांत्वनापर अमित ठाकरेंना अश्रू अनावर

ही भाजपविरोधातील लढाई

यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सत्तेसाठी भाजपने कटकारस्थान रचले. जीव घेऊन सत्ता मिळवण्याचा हा प्रकार लोकशाहीला घातक आहे. संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी ही भाजपविरोधातील लढाई आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनीही भाजप सरकारवर जोरदार टीका केली. शरद कोळी म्हणाले, भाजप सरकारपेक्षा इंग्रज सरकार बरे होते. भारतीय जनता पार्टी लोकांचा जीव घेऊन, उमेदवार पळवून आणि प्रशासनावर दबाव टाकून निवडणुका जिंकत आहे.

राजकीय वातावरण तापले

या आंदोलनामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, सरवदे हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी महाविकास आघाडीने केली आहे. तर सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे सोलापुरात मोठ्याप्रमाणात आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने सरवदे यांचे कुटुंबीय भावुक झाले आहे. सरवदे यांची पत्नी आणि मुलीने टाहो फोडला असून मला माझे पप्पा परत आणून द्या अशी मागणी सरवदे यांच्या लेकीने केली आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts