• Home
  • महाराष्ट्र
  • बाळासाहेब सरवदे खून प्रकरणातील 4 आरोपींना कराड जवळ अटक
Top News

बाळासाहेब सरवदे खून प्रकरणातील 4 आरोपींना कराड जवळ अटक

Police arrest four accused near Karad in Balasaheb Sarwade murder case

Balasaheb Sarwade murder case arrest : सोलापूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या खुनातील फरार चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या चारही संशयित आरोपींना पुढील तपासासाठी सोलापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

मनसे विद्यार्थीसेनेचे सोलापूर शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील चारही संशयित आरोपींना तळबीड पोलिसांनी तासवडे टोलनाक्यावर सापळा रचत अटक केली आहे. या चारही संशयित आरोपींना पुढील तपासासाठी सोलापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणाततील काही आरोपींना अटक करण्यात आली असून शंकर शिंदे, सुनील शिंदे, आलोक शिंदे आणि महेश भोसले, हे चार संशयित आरोपी फरार झाले होते. त्यांना आता अटक करण्यात आली आहे.

मला माझे पप्पा परत आणून द्या

याप्रकरणानंतर अमित ठाकरे यांनी मृत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी ‘ मला माझे पप्पा आणून द्या, माझ्या पप्पाला मी भेटलेच नाही’, असा आक्रोश बाळासाहेब यांच्या चिमुकलीने अमित ठाकरे यांच्यासमोर केला. यावेळी अमित ठाकरे यांना देखील गहिवरुन आले होते. याप्रकरणी सोलापुरात मूकमोर्चा देखील काढण्यात आला.

हे ही वाचा : किरकोळ वादातून तरुणाची हत्या; हाणामारीचा व्हिडीओ CCTV मध्ये कैद

मूक आंदोलन

पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शहरात मुक आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काळ्या फिती लावून भाजप विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

15 जणांविरोधात गुन्हा दाखल

मृत बाळासाहेब सरवदे खून प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग 2 येथील उमेदवार यांच्यासह 15 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेत असताना भाजपच्या उमेदवार शालन शिंदे आणि मृत बाळासाहेब सरवदे यांच्या वाद झाला होता. त्यामुळे भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांनी मृत बाळासाहेब सरवदे याच्या डोळ्यात चटणी टाकून आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. या आशयाची तक्रार नोंदवण्यात आली आहे. मृत बाळासाहेब यांचा भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे याच्या फिर्यादीवरून 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts